शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवी रमेश चौधरी यांना कुलगुरुंच्या हस्ते प्रदान
![]()
शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवी रमेश चौधरी यांना कुलगुरुंच्या हस्ते प्रदान
शिक्षक दिनाच्या दिवशीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मार्फत कुलगुरू प्रो.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते व मार्गदर्शक डॉ.राहुलजी सनेर यांच्या उपस्थितीत विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवीचे नोटिफिकेशन घेण्याचे भाग्य रमेश गोकुळ चौधरी ( नंदुरबार डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता ) यांना दि .५ सप्टेंबर २०२४ रोजी प्राप्त झाले.शालेय शिक्षणानंतर एस.एस.सी.डी.एड. ते विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) पदवीपर्यंतचा प्रवास हे ऐतिहासिक ध्येयपर्व सुरूच होते.शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो या बिद्रवाक्यान्वये असीम ध्येयाने प्राथमिक शिक्षक ते जिल्हास्तरीय अधिकारी पदापर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता भगिरथ प्रयत्नाने वाढवितांना डायटला अध्यापन करीत असतांनाच मला अध्ययनात अवर्णनीय व अजोड अद्वैतीय परमानंद प्राप्त झाला. विद्यावाचस्पती प्राप्ती पर्यंतच्या या सुखद प्रवासात शालेय शिक्षणापासून तर आजतागायत अनेक गुरुवर्य , शिक्षक, सन्मित्र यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनाच्या फलश्रुतीने इथपर्यंत पोहोचता आले. समस्त मार्गदर्शकांच्या ऋणात मी आजन्म राहू इच्छितो अशी कृतज्ञ भावना आमचे मराठी लाईव्ह न्यूज पोर्टलचे जळगाव महानगर प्रतिनिधी विजय लुल्हे यांच्याशी बोलतांना ज्येष्ठ अधिष्ठाता डॉ.रमेश चौधरी यांनी विनयशीलपणे व्यक्त केली .

