अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट,अविस्मरणीय आठवणींना उजाळा!
![]()
अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट..
अविस्मरणीय आठवणींना उजाळा!
लोकमत वृत्तपत्र समूहाचे उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील पहिले यशस्वी पाऊल १९८०च्या दशकात अहमदनगर आवृत्तीने टाकले!ते पाऊल दमदार आणि सामर्थ्यशाली बनविण्यात ७-८ वर्षांच्या सेवेचा माझाही खारीचा वाटा होता,याचा मनापासून आनंद वाटतो.काल अहमदनगर दौऱ्यात लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. माझ्या समवेत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे सचिव महेश कुगांवकर, अहमदनगर जाहिरात एजन्सीज् संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख हेही होते.नगर लोकमतचे सरव्यवस्थापक व माझे मित्र नरेंद्र अंकुश यांनी आमचे स्वागत केले सत्कार केला.संपादक मित्र सुधीर लंके,वितरण विभागाचे वैद्य आणि लोकमत परिवाराने आस्थेवाईकपणे संवाद साधला.खूप खूप समाधान वाटले.
*राजा माने,*
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

