विश्वनाथ पांचाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षारत्न पुरस्काराने सन्मानित
1 min read

विश्वनाथ पांचाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षारत्न पुरस्काराने सन्मानित

Loading

विश्वनाथ पांचाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षारत्न पुरस्काराने सन्मानित

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

कुर्ला गांधी बाल मंदिर शाळा येथील शिक्षक विश्वनाथ पांचाळ व एन सी सी ऑफिसर गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला यांना चंद्राई बिग बिलियन मल्टिपर्पज फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ठाणे येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.विश्वनाथ पांचाळ सर यांना 32 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली असून विद्यार्थी प्रिय आणि उपक्रमशील शिक्षक आहेत.ते नेहमीच शाळेतील विद्यार्थीना विविध प्रकारे मार्गदर्शन करीत असतात.याआधी देखील त्यांना चांगले काम केल्याबद्दल विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श गुरुजन पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *