पत्रकारांचा संवाद संपत चालला – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
1 min read

पत्रकारांचा संवाद संपत चालला – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Loading

पत्रकारांचा संवाद संपत चालला :- मंत्री विखे
शिर्डी/ प्रतीनिधी
समाजात मनभेद होऊ नये, सामाजिक पाठबळ मिळू नये विसंवाद वाढत चालला असून ही चिंतेची बाब असून त्यावर चिंतन करण्याची आवश्यकता असून पत्रकारांचा संवाद संपत चालला तर हा उथळपणा ही चिंतेची बाब बनत आहे याची खंत असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे संपन्न होत आहे. त्याप्रसंगी मंत्री विखे बोलत होते. पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामध्ये बरीच तफावत असून पूर्वी वेगवेगळे विषयावर लिखाण काम होत असे, विकासाचे मुद्दे असतील, लोकांचे विषय असतील, राजकीय भूमिका आदि वर लिखाण होत. प्रिंट मीडियाचे महत्व कमी झाले, इलेक्ट्रॉनिक काही मागे पडत चालले आहे तर सोशल मीडियाने आपला ताबा य प्रसार माध्यमावर मिळवलेला आहे. ही आव्हाने माध्यमांना पेलावी लागणार असल्याचेही ते म्हणाले. याबाबत पत्रकारांनी आपल्या लेखणीतून दर्जा उंचावावा . दुसरीकडे राजकीय स्थितीचाही दर्जा खालावला असून यास राज्यकर्ते तितकेच दोषी असल्याचेही ते म्हणाले. फेक नेरेटिव्हचे प्रस्थ वाढत चालले आहे. पूर्वी राज्यकर्ते घोषणा ठरवत होते. आता यामध्ये माध्यमाचा सहभाग वाढला असून आता माध्यमे ठरावच माध्यमे ठरवत असल्याचे ते म्हणाले. राजकारण आणि प्रसार माध्यमे हे एकाच नावेत दोघेही बसले असून त्यांनी आपले दायित्व वेळीच ओळखले पाहिजे. स्वतःमध्ये बदल केले नाही तर आपणास त्याची किंमत मोजावी लागेल असे ते म्हणाले माध्यमांना अनेक समस्याला सामोरे जावे लागेल. बदल स्वीकारले पाहिजे. मनुष्यबळ ही एक चिंतेची बाब असून विशिष्ट तंत्रज्ञानाने भविष्य चालणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांचा संरक्षण कायदा, प्रलंबित प्रश्न, पेन्शन योजना याबाबतही विचार झाला पाहिजे. मालकांनी स्वतःचा हक्क लादला असून पत्रकारावर ही गदा बनल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली. पत्रकारांचे घर, लग्न, शिक्षण जीवघेणी स्पर्धा, यामुळे पत्रकार कात्रीत सापडलेला असून आयोगाने ठराव करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य येईल. पत्रकारांचे जीवनात अस्थैर्य नको असेही ते म्हणाले. नवी मुंबई आणि ठाणे यासाठी आपण पत्रकारांच्या जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उद्योजक राणा सूर्यवंशी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *