राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट
![]()
राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट
दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर /2024 या कालावधीत अमरावती येथ महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अमरावती जिल्हा बेसबॉल संघटनेच्या द्वारे आयोजित झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत दि. बेसबॉल असोसिएशन फॉर जळगाव जिल्ह्याचे संघ सहभागी झाला होते सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्याला दुहेरी मुकुट प्राप्त झाले यात मुलांच्या संघाने गोल्ड मेडल प्राप्त केले व मुलींच्या संघाने सिल्वर मेडल प्राप्त केले लिग सामन्यात वाशिम , पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, या संघावर एकतर्फी विजय मिळवून सेमी फायनल अहमदनगर संघाची होऊन 6/1होम रन ने विजय मिळवलाव अंतिम सामना अमरावती संघाशी झाला अमरावती संघाला 7/4 होम रन ने हरवून अजिंक्यपद मिळवले . या संघात तोहीत पिंजारी,मानव राठोड , अनिल गवळी, वेदांत गवळी, आदित्य गवळी, चेतन थोरात, विक्रांत निकम, साई राजपूत या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जळगाव संघाला अजिंक्यपद मिळवून देण्यास मेहनत घेतली. त्याचप्रमाणे मुलींच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या संघाने अमरावती,, अहमदनगर, पुणे, भंडारा, लातूर या संघाचा पराभव करत अंतिम सामना सांगली जिल्ह्या बरोबर झाला या सामन्यात सांगली संघासोबत 6/5 होम रन पराभव झाला . त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींना उपविजेयी पदावर समाधान मानावे लागले या संघातील खेळाडू अक्षदा महाजन, नेहा जाधव, मानसी पाटील, वैभवी चव्हाण या मुलींनी जळगाव संघासाठी चांगला खेळाचे प्रदर्शन करून आपल्या संघाला उप विजयी केलें. राज्यस्तरीय जुनियर बेसबॉल स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने सलग तीन वेळेस विजेते पद मिळवले आहे (हॅट्रिक )१)16 वी राज्य ज्यू स्पर्धा कोल्हापूर,२) 17 वी ज्यू राज्यस्तर बेसबॉल स्पर्धा अमरावती,३) 18 वि राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव संघाने सातत्याने विजय मिळवलेला आहे यामुळे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनने जळगाव संघाचा विशेष असा सत्कार केला. या संघाला मार्गदर्शन जिल्हा संघटनेचे सचिव डॉ प्रदीप साखरे, अजय गोपाळराव देशमुख, योगेश साळुंखे,निलेश गाढवे, योगेश शिंदे, निशांत राजपूत, शाहू देशमुख, दशरथ जाधव, नयन नवले, सोहम कोष्टी, यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राज्य बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र इखनकर , राज्य सहसचिव तथा जळगाव जिल्हा सचिव डॉ.प्रदीप साखरे सर, अशोक सरोदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे अभिनंदन बेसबॉल राज्य व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ,सचिव व सदस्यांनी यांनी केले.

