शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता पाटील यांची नियुक्ती
![]()
शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता पाटील यांची नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव साहेब ठाकरे यांच्याआदेशान्वये शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले भरीव काम त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन कौशल्य तसेच नुकत्याच अमळनेर येथे संपन्न झालेला शिवसेनेचा यशस्वी मेळावा. मेळाव्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असताना त्यांची राज्य संघटक पदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. या थोड्याच अल्पावधीत त्यांच्या निवडीने अंमळनेर तालुका व शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब सहसंपर्क प्रमुख गुलाबभाऊ वाघ जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे डॉ हर्षल माने महानंदा ताई पाटील युवासेना सचिव विराज कवाडिया जिल्हा युवासेना प्रमुख निलेश चौधरी यांनी अभिनंदन केले तसेच अमळनेर शहरातील शिवसेना पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले

