पदापेक्षा व्यक्ती महत्त्वाची- उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, अमळनेरच्या भूमीमध्ये उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले व सौ  सुषमाताई देसले यांचा सहपत्निक झाला सत्कार
1 min read

पदापेक्षा व्यक्ती महत्त्वाची- उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, अमळनेरच्या भूमीमध्ये उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले व सौ सुषमाताई देसले यांचा सहपत्निक झाला सत्कार

Loading

पदापेक्षा व्यक्ती महत्त्वाची-
उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले

अमळनेरच्या भूमीमध्ये उपविभागीय अधिकारी देसले व सौ देसले यांचा सहपत्निक झाला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
‘प्रशासकीय अधिकारी हे ‘टीम लीडर’ असतात. दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी नाही; तर अभिनव उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नेमणूक होत असते, त्यासाठी सामाजिक संवेदनशीलता जोपासणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या पदावर आहात, यापेक्षा तुम्ही कसे काम करता हे महत्त्वाचे आहे’
अमळनेर येथील भूमिपुत्र वासुदेव देसले साहेब यांची पेठ उपविभाग त्र्यंबकेश्वर नाशिक ग्रामीण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल
अमळनेर येथे मित्रपरिवाराने सहपत्निक सत्कार प्रसंगी उत्तर देतांना सांगितले
पुढे ते म्हणाले की आपल्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढे चांगले करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.. माझ्याजवळ गरीबातला गरीब व्यक्ती जरी असेल तो माझ्यासाठी महत्त्वाचा असतो.. आपल्या हातून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा केली पाहिजे असे सांगत आज अमळनेरकरांनी जे माझ्या परीवाराला प्रेम दिले आहे मी ते कधी विसरू शकत नाही असे सांगितले.
सत्कार प्रसंगी शरदचंद्र पवार गटाच्या राज्याच्या महिला उपाध्यक्षा
तिलोत्तमाताई पाटील यांनी महीला मंचाच्या भगिनी शिर्डीला जातांना आलेले अनुभव कथन करत साहेबांनी केलेले सहकार्य सांगत देसले सर म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आहे असे सांगितले.त्यांच्या पत्नी सुषमाताई देसले हे दहिवद गावाच्या लोकनियुक्त सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदावर प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा करत आहेत..
तर प्रा. अशोक पवार म्हणाले की देसले परिवार म्हणजे सुखदुःखात नेहमी पाठीशी असतात तळागाळातल्या लोकांना मदत करणे हा त्यांचा छंद आहे.. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आज फळ त्यांना मिळालं ते उपविभागीय अधिकारी झाल्याचा तमाम अमळनेरकरांना अभिमान आहे असे सांगितले..
मा.जिल्हा परिषदेचे सदस्य गिरीश पाटील,डॉ नवसारीकर, ज्येष्ठ पत्रकार उमेश धनराळे,अजय भामरे,डॉ युवराज पाटील यांनी वासुदेव देसले साहेबांचा आलेला अनुभव कथन करत त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या..
डीवायएसपी वासुदेव देसले यांचा सहपत्निक सत्कार प्रसंगी हाँटेल देवाज येथे शरदचंद्रजी पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील ,दहीवद येथील लोकनियुक्त मा. सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले, सत्कार कार्यक्रमाचे आयोजक हिरालाल पवार,
प्रा.अशोक पवार,मा.जिल्हा परिषदेचे सदस्य गिरीश पाटील,शत्रुगण पाटील,डॉ युवराज पाटील,मा.नगरसेवक
विनोद पाटील,मगन पाटील, डॉ विक्रांत पाटील, डॉ किरण बडगुजर ,डॉ शरद बाविस्कर ,डॉ नवसारीकर, व्हाईस मीडियाचे पदाधिकारी जयेश कुमार काटे ,उमेश धनराळे, ईश्वर महाजन, सोपान भवरे,अजय भामरे,सह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

काही सत्कार प्रसंगी क्षणचित्रे

 

मराठी लाईव्ह न्युज…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *