माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे
![]()
माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल.
प्र कुलगुरू एस.टी. इंगळे
असोदा – जगण्याला मोल आहे, अर्थ आहे माणसाचं जगणं हे सर्वांनसाठीच महत्वाचं असं आहे त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सांसारिक प्रपंचाला योग्य अशा वळणावर नेण्यासाठी, जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाताना जिद्द आणि महत्त्वकांक्षा किती महत्त्वाची असते याचा सार बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे असे विचार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रोफेसर एस. टी. इंगळे यांनी सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते मनोगतात त्यांनी कवयित्री बहिणाबाईंनी आपल्या रोजच्या जगण्यातल्या, माणसांच्या वागण्यात बोलण्यातल्या अनेक गोष्टी त्यासोबतच शेती, निसर्ग, संसारात घडणाऱ्या अनेक प्रसंगांना आपल्या बोलीतील कवितेत मांडणी करीत समाज मनाला उपदेश केलेला दिसून येतो यातून भावनिक नातं त्यांच्या कवितेशी जोडले गेल्याचे देखील अनुभवास आल्याचे मत त्यांनी मांडले, ह्या प्रसंगी जुन्या वस्तू व चित्र प्रदर्शन तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर चेअरमन उद्धवराव पाटील पर्यवेक्षक एल.जे. पाटील, शुभांगीनी महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची प्रतिकृती साकारलेली प्रज्ञा कापडणे विचार मंचावर उपस्थित होते. छायेश पाटील, नूतन वाणी यांनी कवयित्री बहिणाबाई विषयी माहिती सांगितली. प्रियंका वाणी, पल्लवी वानखेडे, योजना कोल्हे, मोक्षा पाटील या विद्यार्थीनीनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची मानूस मानूस ही कविता सादर केली. सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेवर आधारित नृत्य सादर केले. प्र.कुलगुरू एस. टी. इंगळे यांच्या हस्ते मीनाक्षी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू व चित्रांचे व पुस्तकपेढीचे (वाचन कप्पा) उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती वाघुळदे, प्रास्ताविक भावना चौधरी, परिचय एस. डी. कचरे तर आभार वृषाली चौधरी यांनी मानले.यावेळी मान्यवर अतिथीच्या हस्ते कला शिक्षिका मिनाक्षी कोल्हे,भावना महाजन चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

