दहिवद गावाचे सुपुत्र वासुदेव देसले साहेब यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (D.Y.S.P) पदी पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण ला पदोन्नतीवर बदली
![]()
दहिवद गावाचे सुपुत्र वासुदेव देसले साहेब यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (D.Y.S.P) पदी पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण ला पदोन्नतीवर बदली झाली.।
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- दहिवद तालुका अमळनेर येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा करून आपल्या सेवेला प्राधान्य दिले सर्वसामान्य साठी एक अधिकारी असा असतो याची ज्वलंत उदाहरण म्हणजे वासुदेव देसले साहेब..
नंदूरबार पोस्टे ला वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा कार्य भार प्रभावी पणे सांभाळत असतानाच त्यांची शासनाने पोलिस उप अधीक्षक पदावर पदोन्नती करून पेठ त्रिंबकेश्वर हया विभागाचे , उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती केली , त्यांचे पदोन्नती व पेठ उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबदल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे,वासुदेव देसले अत्यंत कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत सोबतच उच्च शिक्षित व तळागाळातील वर्गाला न्याय मदत देण्यातविशेष पुरवितात , स्वतः मास्टर ऑफ सोशल वर्क आहेत., सोबतच त्यानी M.Sc,LL.B,MBA,MSW सारखे पदव्या धारक असलेने पेठ सारख्या दुर्गम भागातील नागरिकाना न्याय देवून त्यांचे समाजिक कार्यात निचितच मदत करतीलच अशी अपेक्षा आहेच उत्कृष्ट कार्यामुळे
उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पेठ नाशिक ग्रामीणला त्यांची पदोन्नती झाली..
कोरोना काळातही त्यांचे उल्लेखनीय काम होते.. सामाजिक बांधिलकी ते नेहमीच जोपासत असतात.. कायदा सुव्यवस्था राखणे व तळागाळातल्या उपेक्षित लोकांना न्याय देणे यास नेहमीच प्राधान्य दिले आहे..
त्यांचे अभिनंदन त्यांच्या पत्नी दहिवद गावाच्या मा. लोकनियुक्त सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका ताईसाहेब सुषमाताई देसले व अमळनेर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले..
तसेच नागपूर, धुळे, सोनगीर, भुसावळ, बसवंत पिंपळगाव, सटाणा मालेगाव, कोपरगाव विसरवाडी नंदुरबार येथे सेवा बजावली असून दहिवद ग्रामस्थ व अमळनेर तालुक्यातील मित्रपरिवार कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी अभिनंदन केले..

