अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार..  तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार..
1 min read

अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार.. तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार..

Loading

अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार..

तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- साथी गुलाबराव पाटील स्मृती सोहळा अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालय व अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेर यांच्या वतीने कार्यक्रम 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे..
22 ऑगस्ट गुरुवारी दुपारी एक वाजता साने गुरुजी विद्यालय प्रांगणामध्ये नूतन इमारत भूमीपूजन व अतिरिक्त जल कुंभाचे उद्घाटन होणार आहे..
भूमिपूजन जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदीप पवार यांच्या हस्ते होणार आहे तर जलकुंभाचे उद्घाटन तर उदय मधुकर पाटील ग.स सोसायटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते तर कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. रमेश नथू महाजन सामाजिक कार्यकर्ता धरणगाव , कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दामोदर वाढवे सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर यांची उपस्थिती राहणार आहे..
वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा 23 ऑगस्ट सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर अमळनेर येथे वकृत्व स्पर्धेचे नियोजन समितीचे पदाधिकारी उद्घाटन करणार आहेत.. 24 ऑगस्ट शनिवारी दुपारी तीन वाजता नाट्य सभागृहात बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.. साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षीचा प्रथम वर्ष मानकरी मधुकर भोजू शिरसाट प्राचार्य राजेंद्र छात्रालय धुळे यांना पद्मश्री कांतीभाई शहा संस्थापक युवक बिरादरी मुंबई यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे ..
तर साती गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार प्राध्यापक सुधीर गौतमारे खुर्सापुर जि. नागपूर यांना मा.आमदार कपिल पाटील संस्थापक शिक्षक भारती मुंबई यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला नवीन दिशा देणारे मनोगते असतील ..अमळनेरकरांसाठी वैचारिक मेजवानी कोणीही चुकू नये असा संवाद सोहळासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील ,सचिव संदीपजी घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव एडवोकेट अशोक बाविस्कर, सदस्य अमृत पाटील, डॉ यशवंतराव देशमुख, डॉ शेख शकील जलोद्दीन ,भास्कर बोरसे ,मगन पाटील, किरण पाटील, युवराज सोनवणे , मुख्याध्यापक संजीव पाटील, सुनील पाटील, श्रीमती अनिता बोरसे, सौ वैशाली चव्हाण शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *