खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत खुली निबंध स्पर्धेचे आयोजन
![]()
खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत खुली निबंध स्पर्धेचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या संकल्पनेतील माझा खानदेश या विषयावर खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वैधानिक मंडळाच्या धर्तीवर खानदेशावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि खानदेशाच्या विकासासाठी खानदेश वैधानिक विकास फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू समोर ठेवून खानदेश स्तरीय फोरम विस्तृतपणे उभा राहण्यासाठी त्यात आपल्या संकल्पना आणि आपल्या विचारणा कृती रूप देण्यासाठी खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा दोन गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर निबंध स्पर्धा हि निशुल्क आहे. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार -चार स्पर्धक काढले जातील यासाठी बक्षिसाचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तक असे आहे तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे निबंधासाठी शब्द मर्यादा पहिल्या गटासाठी दोन हजार शब्द आणि दुसऱ्या गटासाठी तीन हजार शब्द आहे तरी स्पर्धकांनी आपले निबंध 31 ऑगस्ट 2024 पर्यंत श्री विलासराव पाटील ( अध्यक्ष खानदेश वैधानिक विकास फोरम ) 65, गारवा, सद्गुरु कॉलनी , दत्त मंदिर परिसर देवपूर धुळे पिनकोड -42 4005 या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन खानदेश वैधानिक विकास फोरमचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपक बाविस्कर आणि सचिव डॉ संभाजी पाटील यांनी केले आहे.

