शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी समता शिक्षक परिषद धरणे आंदोलन करणार  संघटनेचे राज्य अधिवेशन मे 2025 मध्ये जळगाव येथे होणार
1 min read

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी समता शिक्षक परिषद धरणे आंदोलन करणार संघटनेचे राज्य अधिवेशन मे 2025 मध्ये जळगाव येथे होणार

Loading

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी समता शिक्षक परिषद धरणे आंदोलन करणार

संघटनेचे राज्य अधिवेशन मे 2025 मध्ये जळगाव येथे होणार
………………………………………….

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन मे 2025 मध्ये जळगाव येथे घेतले जाणार असून सदर राज्य अधिवेशनामध्ये राज्यातील एक हजार शिक्षक सहभागी होणार असल्याची माहीती संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी आज जळगाव येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात संपन्न झालेल्या सभेत दिली. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सभा आज जळगाव येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असून भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाकरिता संघटनेमार्फत 27 ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
समता शिक्षक परिषदेच्या राज्य अधिवेशनाच्या संयोजन समिती पदी संघटनेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे यांची निवड करण्यात आली. विविध कार्यकारिणी गठन समिती प्रमुख पदी धनराज मोतीराय अण्णा यांची निवड करण्यात आली. प्रवीण केदार, बी.एन. पाटील, रणजीत सोनवणे, वर्षा अहिरराव, प्रकाश तामस्वरे इत्यादींचा कार्यकारणी गठन समितीमध्ये समावेश करण्यात आला. डॉक्टर अशोक सैंदाणे यांची संघटनेच्या प्राथमिक विभागाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांकरिता आयोजित वक्तृत्व स्पर्धा नियोजन समिती सदस्य पदी बापूराव ठाकरे, अजय भामरे, डॉक्टर अशोक सैंदाणे यांची निवड करण्यात आली. डॉक्टर बापूराव शिरसाठ यांची माध्यमिक विभागाच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांनी संघटनेचे राज्य अधिवेशन मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सभे प्रसंगी उपक्रम विभागाचे पूर्व विभाग अध्यक्ष गणेश बच्छाव, पश्चिम विभाग अध्यक्ष मनोज नन्नवरे, बी एन पाटील, प्रविण केदार, धनराज मोतीराय, प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, रणजीत सोनवणे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय भामरे, बापूराव ठाकरे भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक तायडे सर, जिल्हा उपाध्यक्ष हेर्मेंद्र सपकाळे, वर्षा अहिरराव, भारती ठाकरे, प्रतिभा पाटील, शैला जाधव, सुधाकर मोरे, टी.बी. पांढरे, सुधीर महाजन, चिंतामण जाधव, संदीप भंगाळ इत्यादी शिक्षक सभेला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *