ग. स. सोसायटी चोपडा शाखेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
ग. स. सोसायटी चोपडा शाखेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ग.स. सोसायटी जळगांव अंतर्गत चोपडा शाखेत 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग. स. सोसायटीचे स्थानिक संचालक व कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष श्री. योगेश सनेर तसेच चोपडा येथील संचालक श्री. मंगेश भोईटे यांनी चोपडा तालुक्यात संचालक पदाची निवड झाल्यापासून संस्थेच्या भरभराटीत योगदान देणाऱ्या सभासदांच्याच हस्ते धनादेश वितरण व धजारोहाणाची आदर्श परंपरा निर्माण केलेली असून या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग. स. सोसायटी चोपडा शाखेचे धजारोहण लासूर केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम रतिलाल चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले सुरवातीला प्रस्तावानेत संचालक योगेश सनेर यांनी प्रमुख मान्यवरांचे कार्य सांगून उपस्थित सगळ्यांचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे जेष्ठ सभासद व सहकार गटाचे नेते भाऊसाहेब आर. एच. बाविस्कर व मान्यवरांच्या हस्ते उपस्थिती प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण नवनियुक्त केंद्रप्रमुख वैशाली प्रविण पाटील, केंद्रप्रमुख दिनेश नथ्थु चौधरी, ग्रेडेड मुख्याध्यापक गुरुदत्त निंबाळे यांचा सत्कार करणेत आला. यावेळी संस्थेचे जेष्ठ सभासद लक्ष्मण सोनवणे, रावसाहेब कंखरे, एन. बी. बडगुजर सर, आरोग्य विस्तार अधिकारी सुशील सोनवणे, प्रमोद देवरे शाखाधिकारी माधवराव सोनवणे, दिलिप सपकाळे, स्मिता मोरे, जगन्नाथ बाविस्कर,शरद पाटील यांचेसह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

