रयत इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
रयत इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
रयत इंग्लिश स्कूल सिडको महानगर -१ म्हाडा कॉलनी तिसगाव या शाळेत स्वतंत्र दिनी साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला शाळेचे भरत तिरमखे सर संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक , वंदना पाटील मॅडम, रमेश सुरडकर सर,मेघा खैरे मॅडम, पुजा जाधव मॅडम, रंजना ठाकरे मॅडम उपस्थित होते.तसेच स्वागत गिते,देश भक्ती गीते, लेझीम, भाषणं, देशाप्रती वेशभूषा परिधान करून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी परिश्रम घेतले.त्याचबरोबर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वह्या पुस्तके वाटप करण्यात आले.

