“एक हात मदतीचा-दिव्यांगांचा कल्याणाचा” धरणगाव तहसील कार्यालयात शासकीय योजनांचा पंधरवडा उत्साहात  ▪️दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
1 min read

“एक हात मदतीचा-दिव्यांगांचा कल्याणाचा” धरणगाव तहसील कार्यालयात शासकीय योजनांचा पंधरवडा उत्साहात ▪️दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी

Loading

“एक हात मदतीचा-दिव्यांगांचा कल्याणाचा” धरणगाव तहसील कार्यालयात शासकीय योजनांचा पंधरवडा उत्साहात

▪️दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : राज्यात १ ते १५ ऑगस्टदरम्यान महसूल पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यानिमित्त धरणगाव शहरासह परिसरात धरणगाव महसूल कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांचा पंधरवड्याचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तहसील कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगांसाठी “एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा” या उपक्रमाचे आयोजन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन अपंग विकास मंडळाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील
यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
धरणगाव तहसीलचे कार्यतत्पर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले की, दिव्यांग हे देखील समाजाचे घटक आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सरकारने, शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यांगांना आधाराची गरज आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधीदेखील मिळायला हवी. महसूल विभागाने पंधरवडा साजरा करताना या घटकाचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. उपेक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांना लवकरच अंत्योदय योजनेत समाविष्ट केले जाईल. तहसील कार्यालयातर्फे दिव्यांगांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग बांधवांना आपला मताचा मताधिकार बजावता यावा यासाठी सहकार्य केले. तद्नंतर गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिव्यांगांना घरकुल योजनेची माहिती देत सांगितले की, आपण घरकुल संदर्भात कागदपत्र तयार ठेवा. यानंतर अपंग विकास मंडळाचे संजय पाटील म्हणाले की, जि.प. च्या ५% निधीतून दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, व दिव्यांग बंधू-भगिनींना बॅटरीद्वारे चालणारी सायकल मिळणे बाबत लवकरच फार्म भरून घेणार असून याबाबत तहसील विभाग, पंचायत समिती व राष्ट्रीय अपंग विकास मंडळ लवकरच कार्यक्रम घेणार असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अपंग विकास मंडळाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, नायब तहसीलदार आर एन उगले, नायब तहसीलदार संदीप मोरे, पुरवठा निरीक्षक किशोर मोरे, महसूल सहाय्यक रविंद्र म्हसकर आदी मान्यवरांच्या हस्ते सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले, यांसह तहसीलदार सूर्यवंशी यांच्या हस्ते ऑनलाईन ई रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले. तर दिव्यांगांसाठी काम पाहणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या पदाधिकारी संजय पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी दिव्यांगांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. सदरील कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून सूनिता चौधरी, ऑपरेटर साकीब खान, गणेश पाटील, विशाल सोनार, लक्ष्मण बाविस्कर, शांताराम पाटील आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, नायब तहसीलदार आर एन उगले, नायब तहसीलदार संदीप मोरे, पुरवठा निरीक्षक किशोर मोरे, महसूल सहाय्यक रविंद्र म्हसकर, अव्वल कारकून सौ.सुनीता चौधरी आदी विचार मंचावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *