वायनाड येथील भूसंकलनात मृत पावलेल्या निष्पापांना आदरांजली वाहत ‘गड वाचवा, गड टिकवा ,संदेश देत केला स्वातंत्र्य दिन साजरा!’
![]()
– बाल गिर्यारोहक मुद्रा करंडे, वय सहा वर्ष.
पुणे प्रतिनिधी
बाल गिर्यारोहक बाल शौर्य पुरस्कार प्राप्त मुद्रा करंडे वय सहा वर्ष. १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यादिना निमित्त मुद्रा अर्चना प्रशांत करंडे रा .काठापूर बु.ता.आंबेगाव जिल्हा पुणे या चिमुकलीने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला श्री क्षेत्र भीमाशंकर अभआरण्यातील किल्ले भोरगिरी येथे केरळ राज्यातील वायनाड येथे अतिवृष्टी दरम्यान मानवी वस्तीत भूसंकलन होऊन मृत पावलेल्या निष्पाप जीवांना आदरांजली समर्पित केली.तसेच गड वाचवा गड टिकवा हा सामाजिक संदेश देत “मै भारत माता बोल रही हूं!” व ” जिजाऊ सांगे शिवबाला ” या विषयावर रोमांचक भाषण सादर केले. स्वातंत्र्य दिन साजरा करत भारताचा तिरंगा डौलाने फडकवत मुद्रा हिने तिरंग्याला सलाम करून मानवंदना दिली.
मुद्राच्या सोबत नेहमीच तिचे बाबा प्रशांत करंडे आणि आई प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर – करंडे यांचे मार्गदर्शन असते. प्रसिद्ध गिर्यारोहक प्रमोद अहिरे नाशिक,वय ६१ वर्षे यांचे मुद्राला नेहमीच गडांच्या मोहिमेचे मार्गदर्शन लाभते.
या मोहिमेतील सर्व फोटो व्हिडिओ ड्रोन शूट सोमनाथ फंड रांजणगाव गणपती यांनी काढले. सह सहाय्य हर्षल फंड,भाग्यश्री करंडे,बजरंग दल राजगुरुनगर यांचे मिळाले.
आता पर्यंत मुद्राने वयाच्या अडीच वर्षापासून गडकिल्ले स्वतः पायी सर करण्याचे बाळकडू आपल्या आई वडिलांकडून घेतले. मुद्रा ने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सर्वोत्तम उंच शिखर कळसुबाई पार करून कळसूबाई सर केले असून रायगड, चावंड, जीवधन,हडसर,रायरेश्वर,शिवनेरी, कोरीगड,तुंग, तिकोणा,नारायणगड मल्हारगड,सिंहगड,निमगिरी, पुरंदर यांसह ३५ किल्ले केले आहेत.आत्तापर्यंत मुद्राला बाल शौर्य पुरस्कार शंभू गौरव पुरस्कार, भैरवी महिला समाज रत्न पुरस्कार कात्रज पुणे, शिवराई चलन छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे .भविष्यात मुद्रा एक प्रसिद्ध वक्ता होईलच त्याच बरोबर एक गिर्यारोहक सुद्धा होईल यात तिळमात्र सुद्धा शंका नाही.


