मारवड महाविद्यालयात “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम
1 min read

मारवड महाविद्यालयात “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम

Loading

मारवड महाविद्यालयात “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी
मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत “नशा मुक्त भारत अभियान” राबविण्यात आले. यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जिवनात नशा किंवा व्यसन न करण्याची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमिन पठाण तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी. यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. देसले यांनी नशा व व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम विषद केले. आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *