धरणगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धा संपन्न !..
1 min read

धरणगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धा संपन्न !..

Loading

धरणगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धा संपन्न !..

धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर

धरणगाव – दिनांक ७ व ८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय बुद्धिबळ खेळाचे आयोजन धरणगाव येथे गुड शेफर्ड अकॅडमी या शाळेत करण्यात आले होते या स्पर्धोंचे उद्घाटन धरणगाव येथील बुद्धिबळ खेळाचे विद्यापीठ खेळाडू श्री समाधान मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुड शेफर्ड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय रावतोळे मॅडम या होत्या सात ऑगस्ट आंतरराष्ट्रीय भालाफेक दिनानिमित्त आदरणीय रावतोळे मॅडम यांच्या शुभहस्ते भाल्याचे पूजनाचा कार्यक्रम ही संपन्न करण्यात आला बुद्धिबळ खेळांच्या नियमांविषयी थोडक्यात तालुका संयोजक सचिन सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पंच म्हणून महेश चौधरी, अमोल सोनार, यशोदीप पालेवाल, वैभव चौधरी यांनी काम पाहिले स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुक्यातील आलेले क्रीडा शिक्षक श्री डी एन पाटील सर, डी एच कोळी सर, वाय ए पाटील सर ,फिलिप्स गावित सर, जितेंद्र ओस्तवाल सर, पवन बारी सर, राकेश धनगर सर, विशाल भोई सर, रोहित सपकाळे सर, साक्षी महाजन मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी आर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री डी एच कोळी सर यांनी केले तर आभार क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर यांनी मानले स्पर्धा पार पाडण्यासाठी गुड शेफर्ड विद्यालयाचे सुपर वायझर श्री जगन गावीत सर यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *