भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ‌)
1 min read

भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ‌)

Loading

भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ‌)

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व पी.ओ. नाहाटा महाविद्यालय द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुला मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष,डॉ. प्रदीप साखरे होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम पाटील यांच्या यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन व श्रीफळ फोडून करण्यत आले. सदर प्रसंगी तांत्रिक समिती सदस्य मेघाश्याम शिंदे, प्रा. मनोज वारके यांच्यासह ज क्रीडा शिक्षक प्रशिक्षक व सर्व खेळाडू उपस्थित होते. विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल सोडून खेळाकडे व क्रीडांगणाकडे वळा असे सांगितले. कारण विद्यार्थी व खेळाडू हे मोबाईलचे व्यसनाधीन झालेले आहे. आपले शरीर व मन सुदृढ ठेवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने व खेळाडूंनी मोबाईल बाजूला ठेवून क्रीडांगणा वरती प्रत्यक्ष येऊन खेळले पाहिजे. त्यामुळे खेळाडूंचा शारीरिक बौद्धिक व सर्वांगीण विकास होत असतो. भुसावळ तालुका बॅडमिंटन भुसावळ तालुका बॅडमिंटन स्पर्धा दि.9/8/2024 रोजी नाहाटा कॉलेज येथे संपन्न झाल्या त्यात
14 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक तप्ती पब्लिक स्कूल द्वितीय उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल ने पटकावला.
17 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल व द्वितीय तप्ती पब्लिक स्कूल संघांने मिळवला..
19 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक नाहाटा कॉलेज संघ हे विजयी झाले.
मुललीं च्या स्पर्धा दि.10/8/2024 रोजी नाहाटा कॉलेज येथे संपन्न झाल्या त्यात
14 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक तप्ती पब्लिक स्कूल द्वितीय उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल .व तृतीय सेंट अलायसिस हायस्कूल भुसावळ यांनी पटकाविले
17 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक. तप्ती पब्लिक स्कूल , व द्वितीय क्रमांक सेंट अलोयसीस स्कूलने मिळवला.
19 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक नाहाटा कॉलेज संघ हे विजयी झाले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी उपप्राचार्य वाय .एम पाटील, तालुका क्रीडा समन्वय डॉ. प्रदीप साखरे तांत्रिक समिती सदस्य प्रा.मनोज वारके श्री मेघश्याम शिंदे व श्री विजय संकत प्रा. अखतर खान, विनय काळे तसेच प्रा शिरीष नारखेडे प्रा.प्रमोद झांबरे प्रा.जयश्री चौधरी,अश्विनी पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मनोज प्रा. मनोज वारके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *