वाचन संस्कृती गावागावात शहरा शहरात रुजविणे काळाची गरज- कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार
![]()
वाचन संस्कृती गावागावात शहरा शहरात रुजविणे काळाची गरज.
कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार
सुशिक्षित आणि सुजाण पिढी देशहितासाठी निर्माण करावयाची असेल तर गावागावात शहरा शहरात वाचन संस्कृती रुजविण्याची गरज असल्याचे मत जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघातर्फे इयत्ता दहावी मार्च 2024 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. विचार मंचावर संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी,तुषार महाजन,अजय महाजन, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील, उपलेखापाल श्री जितेंद्र नेहेते, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ प्रीती पाटील, सहसचिव श्री सुनील भोळे, उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थिनी आदिती कोल्हे ,मिताली भारुडे, फाल्गुनी कोल्हे ,ममता चौधरी, गायत्री चौधरी, पालक ज्योती भारुडे, पल्लवी कोल्हे यांनी आपल्या मनोगतातून यशाचे श्रेय शिक्षकांना दिले. जिद्द, मेहनत, कष्ट ,अभ्यासातील सातत्य यांचा परिणाम हा सत्कार समारंभ आहे ,असे उद्गार काढले .मीनाक्षी कोल्हे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. सूत्रसंचालन पालक शिक्षक संघाच्या सचिव श्रीमती अनिता पाटील यांनी केले तर आभार श्रीमती भारती पाटील यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

