ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग
![]()
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग
सातारा :- प्रतिनिधी दिनांक 29 जून 2024 कोरेगाव व खटाव मान तालुका ओबीसी संघटनेची मीटिंग मंगळवार दिनांक 30 जून 2024 रोजी दुपारी दोन वाजता कोरेगाव रहिमतपूर रोड मॉडर्न हायस्कूल समोर नामदेव मंदिर कोरेगाव येथे आयोजित केली आहे .तरी कोरेगाव व खटाव मान तालुक्यातील ओबीसी बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.*
*दिनांक 11 ऑगस्ट 2024 रविवार रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियम वरती पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सर्व संघटनांचा आजची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आदेशानुसार महा मेळावा आयोजित केला आहे .या मेळाव्यात मराठ्यांना ओबीसी चे प्रमाणपत्र / बनावट कुणबी दाखले देण्याचे काम चालू आहे.त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आहे.कार्यक्रमास मा अन्न व पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ साहेब, आमदार पंकजाताई मुंडे, आमदार विजय वडेदिवार असे सर्व पक्षातील ओबीसी आमदार व खासदार नगरसेवक पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य नगरसेवक यांना निमंत्रित केले आहे.तरी आपल्या खटाव मान कोरेगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्याचा संदर्भात प्रसिद्धी माध्यम प्रचार यंत्रणा जनजागृती ओबीसी जोडू अभियान अंतर्गत राबवण्यासाठी मेळाव्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आयोजन नियोजन करण्यासाठी सदर मीटिंग केली आहे .तरी ओबीसी हितचिंतक, ओबीसीतील रिटायर कर्मचाऱ्यांनी, ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनी या मिटींगला उपस्थित राहून आपले प्रश्न समजावून घेऊया . हा मेळावा माजी ओबीसी नेते आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आयोजित केला आहे.तरी सर्व ओबीसी बांधवांनी शक्य होईल त्या ओबीसींना प्रत्येक गावात वाढ मध्ये वाडी वस्ती वरती हा मेसेज पोहोचवावा व आपणही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे.अशी विनंती कोरेगाव तालुका अध्यक्ष उद्धव करणे व सातारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी युवक युवती पदवीधर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सर्व ओबीसी जातीचे/ राजकीय पक्षांचे कार्यकर्ते लेखक कवी इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया प्रतिनिधी पत्रकार सर्व ओबीसी बांधवांना जाहीर आव्हान केली आहे.*

