सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. :
1 min read

सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. :

Loading

सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. :
भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज सिंधी साई सेवा महिला मंडळातर्फे विद्यालयातील ६१ गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून सिंधी साई सेवा महिला मंडळातर्फे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून सिंधी साई महिला मंडळाच्या पदाधिकारी रेखा करमचंदाणी, छाया हासवाणी, महेक मंधान, वर्षा सिरवाणी, गिता दारा, विद्यालयाचे पर्यवेक्षक शशिकांत रायसिंग, प्रमोदिनी बाविस्कर, अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण सिंधी साई महिला मंडळाच्या पदाधिकारी रेखा करमचंदानी, छाया हासवाणी, महेक मंधान, वर्षा सिरवाणी, गिता दारा यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात एल.एस.तायडे यांनी विद्यालय प्रशासन शहरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त भौतिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत असते व सिंधी साई महिला मंडळ अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करीत असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सुवर्णसिंग राजपूत यांनी केले. गणवेश तयार करण्यासाठी अनमोल सहकार्य करणारे अरुणकुमार बाविस्कर, तुषार भोई व रतीलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सागर हिवराळे, राजू सपकाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *