कल्याण पूर्वेतील गणेशवाडीमध्ये सुसज्ज हॉस्पिटलासाठी महापालिकेकडून हिरवा कंदील. मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पाठपुराव्याला यश.
![]()
कल्याण पूर्वेतील गणेशवाडीमध्ये सुसज्ज हॉस्पिटलासाठी महापालिकेकडून हिरवा कंदील.
मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पाठपुराव्याला यश.
ठाणे :कल्याण ( मनिलाल शिंपी)कल्याण पूर्वेतील गणेशवाडी प्रभागात लहान मुलांचे सुसज्ज हॉस्पिटल आणि महिलांसाठी प्रसूतीगृह सुरू करण्याला केडीएमसी आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन निकम यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तर यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील विशेष सहकार्य केले आहे.
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 92 गणेशवाडी येथील शक्तीधाम संकुल मधील भूखंड सांस्कृतिक भवनाकरिता आरक्षित आहे. या भूखंडावर सुसज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ज्यामध्ये सर्व आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत व इतर सर्व शासकीय योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येतील. हे हॉस्पिटल सुरु करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली व सहकार्याने सतत केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन हा भूखंडावर सुसज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे.
परंतु त्याकामी आरक्षण बदल करणे आवश्यक असल्याने हा प्रस्ताव नगरविकास विभाग, मंत्रालय येथे पाठविण्यात आला असून हा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. या भूखंडावर असलेल्या इमारती मध्ये सुसज्य रुग्णालयाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. आरक्षण बदल होईपर्यंत तेथे आयुक्तांना असलेल्या प्राप्त अधिकारानुसार तातडीने प्रसूतिगृह सुरू करावे व गणेशवाडी येथील गीता हरकिसनदास दलाल या रुग्णालयात सुरू असलेली ओ.पी.डी., कोळसेवाडी नागरी सुविधा केंद्र हे शक्तीधाम येथे असलेल्या इमारतीत सुरू करावे. व गीता हरकीसन दास दलाल या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासोबत नितीन निकम यांची सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान आयुक्तांनी शक्तीधाम येथे असलेल्या सुसज्य इमारती मधे १५ ऑगस्ट पर्यंत तातडीने प्रसूतिगृह सुरु करण्याचे व गणेशवाडी येथे असलेल्या गीता हरकिसन दास दलाल रुग्णालयात लहान मुलांचे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. याप्रसंगी कल्याण पूर्वे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे देखील सहकार्य मिळाले असल्याची माहिती नितीन निकम यांनी दिली.

