वाढदिवस विशेष..  वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल शिंदे..
1 min read

वाढदिवस विशेष.. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल शिंदे..

Loading

रुग्णांना जीवनदान देणारे, निरनिरळ्या आजारांमधून रुग्णांची मुक्तता करणारे असे डॉक्टर्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आजार लहान असो, किंवा मोठा, आपले आरोग्य आपल्या डॉक्टर्सच्या हातामध्ये सोपवून आपण निर्धास्त होतो. ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही डॉक्टर्स अशी ही आहेत, ज्यांनी आपल्या कार्यामुळे आपले तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आगळे स्थान निर्माण केले आहे. ते म्हणजे डॉ अनिल शिंदे..
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अनिल शिंदे
यांचा मोठा अनुभव आहे ते एक उत्कृष्ट सर्जन आहेत.. त्यांनी आजतागायत मोठमोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत..
त्यांचा संपूर्ण परिवार हा उच्चशिक्षित आहे..जावाई हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असून डॉ संदीपजी जोशी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा स्वभाव मीतभाषी असून ते रुग्णांना नेहमीच योग्य सल्ला देत असतात..
कोरोना सारख्या आजारामध्ये नर्मदा फाउंडेशन ने उत्कृष्ट काम केले आहे. अनेक रुग्णांना त्यांनी धीर दिला आहे व त्या आजारातून सावरले आहे..
डॉक्टर शिंदे यांची मुलगी डॉ मयुरीताई जोशी स्त्री रोग तज्ञ आहे. त्यांना पण शैक्षणिक सामाजिक क्षेत्राची आवड आहे.
डॉ अनिल शिंदे यांना वैद्यकीय क्षेत्राबरोबर त्यांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राची ही तेवढीच आवड आहे.. नर्मदा मेडिकल फाउंडेशन नर्मदा मल्टीपर्पज फाउंडेशन माऊली पॉलिटेक्निक चे चेअरमन, खा.शी मंडळाचे ते संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ,ग्रामविकास शिक्षण संस्था मुडीचे संचालक, विविध कार्यकारी विकास सोसायटी पिळोदा येथे संचालक पद अनेक पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षामध्येही ते सक्रिय असून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले, राहुल गांधी व काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क तेवढाच आहे…
राजकीय क्षेत्रात काम करत असताना काँग्रेस पक्षाला उभारी यावी यासाठी पक्ष संघटन वाढवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.. त्यांचा स्वभाव अत्यंत परखड असून जे चुकीचं असेल ते लगेच बोलून मोकळे होतात.. पण तेवढे जवळही करतात व सर्वसामान्य माणसाला मदतही करतात आणि त्यांचे विशेष आहे..
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी दोन शब्द..

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..

शुभेच्छुक
ईश्वर महाजन पत्रकार
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *