प्राईम पब्लिकेशन हाऊसचे दिमाखदार उद्घाटन संपन्न
![]()
प्राईम पब्लिकेशन हाऊसचे
दिमाखदार उद्घाटन संपन्न
———————————
जळगाव ही कवी लेखकांची गुणवतांची भूमी आहे.बहिणाबाई,बालकवी,
भालचंद्र नेमाडे ते शीतल पाटील अशी एक समृद्ध साहित्य परंपरा या भूमीला लाभली आहे.साहित्य लेखन,वैचारिक लेखन,शैक्षणिक लेखनातही जळगाव मागे नाही.या परंपरेचे जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी खान्देशातील अक्षरांना प्रज्जवलीत करण्यासाठी जळगावातील प्रकाशन संस्थानी मौलिकअसे काम जबाबदारीने पाडले आहे.या परंपरेत प्राईम पब्लिकेश हाऊसचे गुरू पौर्णिमेच्या शुभदिनी साहित्य प्रकाशनाचे नवे पर्व सुरू झालेले आहे.या प्रकाशनाचे प्रकाशक प्रदीप पाटील यांनी ही धुरा खांद्यावर घेतलेली आहे. 21 जुलै जळगावच्या स्वातंत्र्य चौकात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज्याचे माजी पोलिस महासंचालक श्री.अजय पांडे यांचे शुभहस्ते या प्रकाशन संस्थेचे उद्घाटन रयतेचे मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन करून भारतरत्न आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाला स्पर्श आणि वंदन करून संपन्न झाले. याप्रसंगी मा.पी.ई.तात्या पाटील अध्यक्ष जिजामाता फाउंडेशन जळगाव, मा.प्रा.ए.पी.चौधरी,अध्यक्ष अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ,जळगाव आणि मा.शशिकांत हिंगोणेकर सुप्रसिद्ध कवी तथा माजी विभागीय सचिव लातूर बोर्ड ,लातूर आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रकाशनाचे निर्मिक प्रदीप पाटील यांनी हि केवळ प्रकाशन संस्था नाही तर खान्देश साहित्य संस्कृती परंपरा जपण्याचे आणि प्रकाशित करण्याचा बांधिलकीचा प्रयत्न आहे.नवे प्रतिभावंताचे साहित्य शोधणे,नवे शिक्षण क्षेत्रातील संशोधने निवड करणे आणि प्रकाशित करणे कर्तव्य मानले आहे.याच बरोबर पी.ई.तात्या अभ्यासिकाही जिल्ह्यातील होतकरू हुषार विद्यार्थ्यांना ग्रंथ उपलब्ध करून स्वतःला आयुष्य उभारणेसाठी सुरू करण्यात आलेली आहे.ही सामाजिक बांधिलकीची भूमिका स्वीकारून नवा समाजही घडवण्याचे काम नम्रपणे करणार असल्याचे सांगितले.शशिकांत हिंगोणेकर मनोगतात म्हणाले की हे प्रकाशन नव्हे तर नवे हक्काचे गुणवत्ता संवर्धनाचे प्रकाशमय दालनच शहरात उघडले आहे.यामुळे खान्देशच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य क्षेत्राला नवसंजीवनी देणारे हे कर्तव्ययान आहे.अध्यक्षिय मनोगतात पी.ई.तात्या म्हणाले की प्रदीप पाटलांचे हे प्रकाशन ज्ञानाचे भांडारच आहे.होतकरु विद्यार्थ्यांना घडवणारे बांधिलकीचे समृद्ध दालनच आहे.समाजाने या प्रकाशन संस्थेच्या पाठीशी उभे राहून हा ज्ञानाचा महायज्ञ अखंड सुरू ठेवावा.या प्रसंगी नवलेखकाचे वतीने विजय अहिरे यांनी हे प्रकाशन म्हणजे नव्या प्रतिभेसाठी नवसंजीवनच आहे.असे गौरवोद्गार काढले.या प्रसंगी चंद्रकांत भंडारी शिक्षणतज्ञ,प्रा.गोपाल दर्जींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अनोख्या कार्यक्रमाचे लक्षवेधी सुत्रसंचालन कवयित्री ज्योती वाघ यांनी केले.

