आदर्श विद्यालय अमळगावचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (M.T.S.E.) सुयश….
![]()
आदर्श विद्यालय अमळगावचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (M.T.S.E.) सुयश….
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर जि. जळगाव येथील इ. ८ वीच्या विद्यार्थिनींनी दि. २३ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या *महाराष्ट्र प्रज्ञा शोध (इ.८ वी. ) परीक्षेत (M.T.S.E.)* घवघवीत यश मिळविले
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे, भावी आयुष्यातील अन्य स्पर्धा परीक्षांची माहिती देणे, स्पर्धा परीक्षांना बसण्याची व त्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी लागणारी जिद्द लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, निवड झालेल्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करणे त्यांना उत्तेजन देणे. हा या परीक्षा घेण्यामागील उद्देश आहे.सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षांनी शैक्षणिक जीवन- विश्व व्यापून टाकले आहे. आज विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या चाकोरीतून जाणे क्रम प्राप्त झाले आहे. शालेय स्तरावरील अशा परीक्षांमुळे बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन रुजविला जातो. म्हणून या परीक्षेचे काही वेगळे महत्त्व आहे.
अशा या काठीण्य पातळी जास्त असलेल्या (थोड्या अवघड परीक्षेत) विद्यालयातील इ. ८ वी च्या खालील ५ विद्यार्थिनींनी (गुणवत्ता यादीत २ विद्यार्थीनींनी तर ३विद्यार्थीनींनी उत्तीर्ण होऊन) सुयश मिळविलेले आहे…
*१.कु. श्रुती चंद्रभान कोळी.*
*२.कु. मानसी रुपेश पाटील.*
*३.कु.दिपाली प्रवीण पाटील.*
*४.कु.धनश्री हरेश गुजराथी .*
*५.कु. वर्षा हरिश चौधरी.*
वरील पाच विद्यार्थिनींपैकी कु. श्रुती चंद्रभान कोळी हिची *तालुका स्तरावरील बक्षीसासाठी निवड* झाली असून कु. मानसी रुपेश पाटील हिला *उत्तेजनार्थ बक्षीस* मिळालेले आहे. उर्वरित कु. दिपाली पाटील, कु.धनश्री गुजराथी व कु. वर्षा चौधरी, या विद्यार्थिनींनी उत्तीर्ण होऊन या परीक्षेत सुयश मिळविलेले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे *मानद सचिव भाऊसाहेब निलेशजी भोईटे, प्रभारी मानद सचिव दादासाहेब विरेंद्रजी भोईटे,* सर्व संचालक मंडळ व स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना *श्री. ए. जी. बैसानेसर, श्रीमती एस. एस. पाटील मॅडम , श्री. आर. जी. देवरेसर व विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. यु. पाटीलसर* यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल म. मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचे पदाधिकारी व परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे…..



