खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!!
![]()
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी!
वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- माणूस जन्मापासून नात्यांच्या सुंदर माळेत गुंबला जातो.. नात्यांची ही माळ सहवासात येणाऱ्या समाज घटकात विस्तारात जाते.. त्याचप्रमाणे सुसंस्कारांचं लेणं लाभलेल्या माणसात माणुसकीचं नातं दृढ होत जाते. याचा प्रत्यय नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या रूपाने आला….
सविस्तर माहिती अशी की
सध्या लसूण चांगलाच भाव खात आहे..
उद्या दुपारी नंदुबार येथे लसुनची प्लास्टिकची पिशवी घेऊन मोटारसायकल वर एक मुस्लिम नागरिक जात होता..अचानक पिशवी तुटली.. संपूर्ण लसुन रोडवर पसरले…, तेव्हा पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावरुन जात होते..पोलीस अधिकारी देसलेसाहेब यांनी
गाडी एका बाजूला लावली…संपूर्ण विखुरलेला लसूण गोळा करण्यासाठी मदत केली.. जर पोलीस अधिकारी यांनी खाकीतील माणूसकी दाखवली नसती तर
लसूणवर गाडया फिरून हातात आले नसते..त्या व्यक्तीने पोलीस अधिकारी देसले यांनी त्यांच्या कामाला सलाम केला..
थोडक्यात काही माणसांचे जीवन हे इतरांसाठीच परमेश्वराने राखून ठेवलेले असते. त्यांनी फक्त समाजाचे व परीसरातील तळागाळातील नागरिकांचे समस्या सोडण्यासाठी धडपडत असतात. आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही ही धारणा ज्याच्याजवळ असते तोच मनुष्य ध्येयाची उंची गाठू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दहीवद येथील लोकनियुक्त सरपंच
सुषमाताई देसले व नंदुरबार येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये इंचार्ज वासुदेव देसले
साहेब होय…

