वारी शिक्षणाची मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनिंचा सन्मानाची.
![]()
वारी शिक्षणाची मुख्याध्यापक शिक्षक
शिक्षकेतर बंधुभगिनिंचा सन्मानाची.
*ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)* – आषाढी एकादशी निमित्त भक्तगण, वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडी काढून पंढरपूरला दाखल होत असतात.कल्याण येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, राज्य सदस्य गजानन भोसले ,आप्पाराव कदम व रत्नागिरी ,रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीत सहभागी होत वारी शिक्षणाची मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर यांच्या सन्मानाची. हरी माऊलीचा गजर देत आपल्या मातृभाषेतून शिक्षण ,मराठी भाषेला राज भाषेच्या दर्जा द्यावा.मराठी माध्यमाच्या शाळा टिकून राहाव्यात. दिनांक 15 मार्च 2024 संच मान्यता शासन निर्णय रद्द व्हावा.याकरिता पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला साकडे घालत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

