सानेगुरुजी शाळेतील पाचवीचा सिद्धेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
![]()
सानेगुरुजी शाळेतील पाचवीचा
सिद्धेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
अमळनेर प्रतिनिधी-
गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा चि.सिध्देश ज्ञानेश्वर पाटील इ 5 वी त सानेगुरुजी आदर्श प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परिक्षेत मेरिट मध्ये पास झाला.त्याला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील शिक्षक,आईवडील यांचे लाभले..
त्याच्या यशाबद्दल अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षणाविस्तराधिकारी कविता सुर्वे ,तालुक्यातील केद्रप्रमुख,गडखांब केद्रातील शिक्षक,देवगाव देवळी येथील शिक्षक विश्वास पाटील,
देवळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक ईश्वर महाजन, हरी माळी,सुरेश महाजन, अरविंद सोनटक्के व गावातील शिक्षणप्रेमी बंधू व भगिनी यांनी
सिद्धेश व त्याच्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन करीत भविष्यात अशीच प्रगती करो हीच सदिच्छा व शुभकामना दिल्या..

