गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…!
1 min read

गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…!

Loading

*गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप*…!

विद्यार्थ्यांना वहया व शैक्षणिक साहित्य यापासून प्रेरणा मिळते – चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे.

धरणगाव प्रतिनिधी :- पी डी पाटील

धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे, ता.(धरणगाव) येथे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी विद्यालयात माजी सरपंच संजय नारखेडे यांच्यामार्फत गरीब विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप केले. यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे,साळव्याचे सरपंच पतिश्री संजय कोल्हे, साळव्याच्या उपसरपंच बलमा बी पटेल, निशाणेच्या सरपंच कल्पना पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सौ पुष्पाताई पाटील, श्री प्रल्हाद कोल्हे व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी मोरे, ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, एस पी तायडे, एस व्ही राठोड, व्ही एस कायंदे, बी आर बोरोले. शिक्षिका नीता पाटील, रंजना नेहेते, प्रतिभा पाटील, गुणवंती पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व्ही के मोरे यांनी केले. वह्या देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा द्विगुणीत करण्यासारखा होता. विद्यार्थ्यांनी लेखन, सुलेखन, हस्ताक्षर व गृहपाठ पूर्ण करावे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *