बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी )
1 min read

बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी )

Loading

धरणगाव तालुका क्रिडा सहविचार सभा उत्साहात संपन्न !…

आदर्श क्रीडा शिक्षक व विद्यार्थी खेळाडूंचा ग्रंथ देऊन सत्कार !…

बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी )

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – धरणगाव तालुका क्रिडा स्पर्धा सन. २०२४ – २५ सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.
प.रा.हायस्कुल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा क्रिडाधिकारी रविंद्र नाईक साहेब, धरणगाव गट शिक्षणाधिकारी श्रीमती भावना भोसले, तालुका क्रिडाधिकारी खो खो खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात साहेब, प्रा.खोंडे सर हे होते. सुरुवातीला धरणगाव येथील पी.आर.हायस्कूल चे क्रीडा शिक्षक कै.मनोज परदेशी सर यांना आदरांजली वाहण्यात आली व नंतर प्रमुख अतिथीचा सत्कार शाॅल बुके व महापुरूषांचे अनमोल ग्रंथ देऊन करण्यात आला. तसेच विशेष सत्कार म्हणून क्रिडाक्षेत्रात राहून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार संभारभात करण्यात आला यात पष्टाणे हायस्कुलचे क्रीडा शिक्षक दयाराम पाटील हे जिल्हा शिक्षक सेल संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. अंजनविहरे येथील क्रिडा शिक्षक नारायण पवार यांना विभागीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळ्याल्या बद्दल गट शिक्षणाधिकारी श्रीमती भावना भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. भाऊसो गुलाबराव पाटील ज्युनियर कॉलेजचे क्रिडा शिक्षक भाला फेक या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर खेळले म्हणून त्यांचा सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.डी.वळवी यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच मार्च २०२३ च्या १० वी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक ने पास झालेल्या सारजाई दामोदर कुडे विद्यालयाच्या डॉजबाॅल व खो खो खेळाच्या विद्यार्थ्यांनीचा ही सत्कार क्रीडा अधिकारी साहेबांच्या व ग.शि.अधिकारी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला
प्रमुख मार्गदर्शक जिल्हाधिकारी रविंद्र नाईक साहेबांनी जिल्ह्यातील शाळेनां क्रिडा स्पर्धा तसेच शासनाच्या विविध योजनाचा शाळेसाठी कसा लाभ मिळवता येईल याची माहिती सांगीतली तसेच क्रिडा शिक्षकांचे काम या विषयी मार्गदर्शन केले. धरणगाव जिल्हा क्रीडाधिकारी मीनल थोरात यांनी क्रिडा स्पर्धाच्या बाबत ऑन लाईन माहिती कशी भरावी या विषयी सविस्तर माहिती सांगितली. तर गट शिक्षणाधिकारी श्रीमती भावना भोसले यांनी बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षणाला किती महत्व असते. याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ अरुण कुलकर्णी यांनी शासनाच्या योजनाचा योजना द्वारे विद्यार्थ्यांची बौद्धीक व शारीरिक प्रगती कशी करता येईल याची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचचे प्रास्ताविक धरणगाव तालुका क्रिडा समन्यवयक सा.दा.कुडे विद्यालयाचे क्रिडा शिक्षक सचिन सुर्यवंशी यांनी केले कार्यक्रम पार पडण्यासाठी धरणगाव सिनियर कॉलेजचे प्रा. दीपक पाटील सर, ज्युनियर कॉलेजचे प्रा. जितेंद्र ओस्तवाल सर, सर्व क्रिडा शिक्षक यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साकरे विद्यालयाचे क्रिडा शिक्षक किशोर पाटील सर यांनी केले तर आभार आर बी. महाले सर यांनी मानले. तालुक्यातील सर्व क्रिडा शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *