जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात – विजय लुल्हे
1 min read

जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात – विजय लुल्हे

Loading

जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात : विजय लुल्हे

‘ डॉक्टर्स डे ‘ निमित्त डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे डॉक्टरांचा भावपुर्ण सत्कार ]
‘ जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात.डॉक्टरांच्या समर्पित रुग्णसेवेला मर्यादा असतात त्यात रुग्णाची अत्यवस्थता,वयोमर्यादा,दवाखान्यात यायला झालेला अक्षम्य विलंब या गोष्टींचे गांभीर्य लक्षात न घेता पेशंटच्या मृत्यूला सर्रास डॉक्टरांना दोषी समजून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात हा अतिशय गंभीर गुन्हा आहे.डॉक्टर हे खरे तर पृथ्वीवरील प्रति परमेश्वर असल्याने ते वंदनीय आहेत.डॉक्टरांबद्दल कृतिशील श्रद्धा ठेवणे भारतीय संस्कृतीनुसार मानव जातीचे परमकर्तव्य आहे.’ असे भावनिक प्रतिपादन विजय लुल्हे यांनी केले.
‘ राष्ट्रीय डॉक्टर्स डे ‘ निमित्ताने भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ व २ जुलै २०२४ रोजी आकस्मिक कर्तव्यतत्पर डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व वाचनीय दर्जेदार कविता संग्रह पाऊसपर्ण – जितेंद्र कुवर व महात्मा जोतीबा फुले यांचे अमर जीवन – शास्त्री नारो बाबाजी महाधट पाटील लिखित पुस्तके देऊन भावपुर्ण सत्कार करण्यात आले त्याप्रसंगी सत्कार करण्यामागील निरपेक्ष भुमिका संयोजक विजय लुल्हे ( डॉ.कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख ) यांनी मांडली त्याप्रसंगी लुल्हे बोलत होते.
*सत्कारार्थी डॉक्टर्स व सत्कार करणारे मान्यवर पुढील प्रमाणे*:-
१ ) वैद्य श्रीरंग एस.छापेकर ( समायु आयुर्वेद क्लिनिक ) – हस्ते अनिल अत्रे ( ग्रंथपाल ,व.वा. जिल्ह वाचनालय ), २ ) वैद्य वृषाली श्रीरंग छापेकर – हस्ते विजय लुल्हे ( जिल्हा समन्वयक, सत्यशोधक समाज संघ,जळगाव ), ३ ) डॉक्टर अविनाश महाजन (अधिष्ठाता,शासकिय होमिओपॅथी महाविद्यालय,जळगाव ) – हस्ते शैलेश भदादे ( संचालक, सिद्धी मेडिकल ), ४ ) डॉक्टर नरेंद्र सोनार ( होमिओपॅथी ) – हस्ते ज्येष्ठ साहित्यिक शांताराम बडगुजर ,५ ) डॉ.किर्ती देशमुख ( मानसोपचार तज्ज्ञ, तथा परिवर्तन पुरस्कृत ‘ लेखकाचे अभिवाचन ‘ उपक्रम ) – हस्ते विजय लुल्हे ,६ ) डॉ.श्रेया बडगुजर ( होमिओपॅथी ) – हस्ते शांताराम बडगुजर,७ ) डॉ.गजानन पाटील ( फिजिओथेरपिस्ट ) – हस्ते प्रा.दिलीप भारंबे ( सचिव,मराठी विज्ञान परिषद,जळगाव ), ८ ) डॉ.श्वेता गजानन पाटील – हस्ते विद्या वाचस्पती प्रा.कल्पना भारंबे ( लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय ),९ ) डॉ.प्रशांत देशमुख ( रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट ) – हस्ते विजय लुल्हे ( संस्थापक जिल्हा प्रमुख ,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव ) सत्कारा प्रसंगी पवन चौधरी,मयूर वाणी,हरिष कोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *