एरंडोल येथे भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका कार्यकारिणी व जिल्हास्तरीय पदे जाहीर
1 min read

एरंडोल येथे भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका कार्यकारिणी व जिल्हास्तरीय पदे जाहीर

Loading

एरंडोल येथे भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका कार्यकारिणी व जिल्हास्तरीय पदे जाहीर

दिनांक 30 जून रोजी एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे भारतीय बौद्ध महासभा (भीमराव आंबेडकर साहेब प्रणित) महिला जिल्हा पश्चिम विभाग मेळावा नुकता संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभा पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई सोनवणे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या तर पूज्य भन्ते अमरजोती यांची मेळाव्याला विशेष उपस्थिती होती.
सदर मेळावा हा जळगाव जिल्हा पश्चिम विभागाचा होता. त्यात एरंडोल, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा इत्यादी सात तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीस पूज्य भंते अमरजोती यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. जिल्हाध्यक्षा मंगलाताई सोनवणे व सरचिटणीस प्रमिलाताई ब्रम्हे यांनी मेळाव्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीतील काही पदे घोषित करण्यात आली. तसेच एरंडोल तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जाहीर झालेली पदे खालील प्रमाणे आहेत.

_*भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग जिल्हा कार्यकारिणी पदे-_
सचिव-वर्षा भरत शिरसाठ
सदस्या- मनीषा चिंतामण जाधव, सुलोचना पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रमिला प्रकाश तामस्वरे

_*एरंडोल शहर अध्यक्ष -_
धम्मज्योती प्रकाश तामस्वरे

_*एरंडोल तालुका कार्यकारिणी-_
तालुका अध्यक्ष- माया गौतम खैरनार
कार्याध्यक्ष – उषाकिरण भीमराव खैरनार
कोषाध्यक्ष- मीराबाई रघुनाथ सपकाळे
उपाध्यक्ष- संगीता सुनील खैरनार
– ज्योती शशिकांत रामोशी
सचिव- जयश्री सुभाष अमृतसागर
सहसचिव- सुमन नगराज बिऱ्हाडे
कविता विश्वनाथ ब्रह्मे

संघटक- सविता विलास सोनवणे
अरुणा जगन्नाथ शिरसाठ
सुवर्णा शंकर शिरसाठ
विजया भूषण जाधव

सदस्य-अर्चना राजू अहिरे
मीना भगवान ब्रह्मे
रमा मुकेश ब्राह्मणे
अलका निंबा खैरनार
सुरेखा गौतम सोनवणे
अर्चना विनय बनसोडे
अनिता युवराज निकम
लताबाई अशोक जाधव
अंजली नवल सोनवणे
दीक्षा बाबुराव भगत

सर्व निवड झालेल्या कार्यकारिणीचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन साहित्यिक भरत शिरसाट यांनी केले होते. कार्यक्रम प्रसंगी भरत शिरसाठ लिखित ‘संविधानाचे अनंत उपकार’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. संस्कार विभाग जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे व बौद्धाचार्य किरण नेतकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या आगामी कार्याचे नियोजन सांगितले. मेळाव्यास जिल्हा व तालुकाभरातून मोठ्या प्रमाणावर महिला उपासीका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *