नंददीप माध्यमिक विद्यालयाचे ए.पी.चव्हाण सरांच्या सेवापुर्ती सोहळा निमित्ताने दोन शब्द…….
1 min read

नंददीप माध्यमिक विद्यालयाचे ए.पी.चव्हाण सरांच्या सेवापुर्ती सोहळा निमित्ताने दोन शब्द…….

Loading

नंददीप माध्यमिक विद्यालयाचे ए.पी.चव्हाण सरांच्या सेवापुर्ती सोहळा निमित्ताने दोन शब्द…….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शाळा आणि शिक्षक हे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय भाग असतात. त्यामुळे त्यांचा निरोप घेतांना त्रास हा होतोच. पण सुख आणि दुःखाच्या क्षणी आधार देतात ते शब्द.
सारं काही जीवनात असतं
तरी का बरं दुःख पाठिशी राहातं
आनंदाचे दोन क्षण आणि दुःखाचे चार क्षण
असं का बरं ओंजळीत येतं
दुःख कितीही झाकून ठेवलं तरीही ते झटकन बाहेर पडतं
कोणाला तरी निरोप देता ते जवळून अनुभवता येतं ….
नंददीप माध्यमिक विद्यालय निम येथील मितभाषी शिक्षक अरुण प्रल्हाद चव्हाण यांनी 29 वर्षे 17 महिने इमानेइतबारे सेवा करून ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले…
विद्यालयातील एक अष्ट पैलू भूमिका करणारे,हाडाचे शिक्षक, शाळेला,विद्यार्थी वर्गाला,संस्थेला व गावाला वं निर्जीव झाडांना सुद्धा हवेहवे से वाटणारे असे कुशल नेतृत्व गुण संपन्न असणारे,सदैव विकासासाठी झपाटलेले, माझ्या सोबतीला 29 वर्ष सेवा देणारे, माझ्या प्रत्येक कार्यास कुशल पद्धतीने साथ देणारे, काम कोणते हि असो त्यास आव्हान देणारे, माझे उजवे हात, अ पासून तर z पर्यंत असेलेली सर्व काम कुशल पद्धतीने हाताळणारे, व सांगितले ले कोणतीही जबादारी पार पाडणारे, लहानसे काम असले तरी तें बिना परवानगी शिवाय न करणारे, शेवटच्या क्षणा पर्यंत अद्यापन सेवा बजावणारे अजात शत्रू, जे आमच्या नंदादीप परिवाराचे सदस्य म्हणजे श्री अरुण प्रल्हाद चव्हाण सर आज नियत वयोमाना नुसार निवृत्व होत आहेत.. त्याच्याबद्दल बोलणे शब्द अपूर्ण पडतील पण मी येथे शब्दना विराम देतो…… सर आम्ही सर्व आपणास साश्रू नयनानी निरोप देत आहोत… असो आपण आपल्या कार्यास, तसेच आपले कुटुंब यशस्वी स्थानावर घेउन जाण्यास मानव म्हणून अचूक व योग्य न्याय देण्यात यशस्वी झालेले आहात यात शंका नाही… उर्वरित आपले आयुष सुख, समृद्धी व भरभराटीचे जावो व आपणास दीर्घ आयुष्य लाभो हि नंदादीप चरणी प्रार्थना….
शुभेच्छुक..
अध्यक्ष,व संचालक मंडळ
मा.बापूसौ अनिल चौधरी
मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, सर्व विदयार्थी व निंब गावकरी बंधु भगिनीं

आदरणीय चव्हाण सरजी..
नंददीप माध्यमिक विद्यालय निम…

 

*शुभेच्छा संदेश*

(आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती
तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती…
सरजी आपण निम माध्यमिक विद्यालयामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करून एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ख्याती होती हे तेवढेच सत्य.. येणाऱ्या काळामध्ये आपण सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कामाकडे वळणार ही अपेक्षा , या अगोदरही आपण प्रमाणिकपणे अनेक पदे भूषवली आहेत..
याची मला जाणीव आहे.. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब अनिल चौधरी सर यांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले.. आपल्या चांगल्या कामांना संधी दिली व आपण त्या संधीचे सोने केले..
सरजी आपणास संत गजानन महाराज सुदृढ आयोग्य देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना..
🌹🌹🌹🌹🌹
ईश्वर आर महाजन शिक्षक तथा पत्रकार अमळनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *