केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड
![]()
केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील २५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाद्वारे संस्कृत भाषेच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यानुसार संपूर्ण देशभरातील संस्कृत विषयात दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विद्यापीठामार्फत वार्षिक ६००० रुपयांची संस्कृत मेधावी शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर शिष्यवृत्तीसाठी सालाबादप्रमाणे यंदाही गौरवशाली परंपरा कायम राहत महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे विद्यापीठाद्वारे नुकतेच अधिकृत पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
जिज्ञासा निंबा सोनवणे,अरूणिमा अभिजीत थोरात,दामिनी गणेश महाजन
तनिशा प्रकाश सपके,वैष्णवी राजेन्द्र पाटील,तेजस्विनी हेमराज शिंदे,स्वप्नील सुभाष बारी,प्रतिक योगेश नेरपगार,
सम्यक ललीत जैन,ध्रुव महेंद्र म्हस्के, कृतिका राजेश कोरे,श्रावस्ती समाधान बिऱ्हाडे,सेजल रविंद्र भोसले,वैदेही किशोर कोतकर,पार्थ राजेन्द्र मावळे,विधी प्रसाद खंडेलवाल,श्रीधर मंगेश जोशी,वेदज्ञा हेमंत उपासनी,पायल सतिश येवले,कावेरी संतोष गिते,खुशी प्रविण पाटील,नुपूर उमेशकुमार सेठिया,गीता अखिलेश पंडित
वैशाली संजय रावतोळे,जास्वंदी संजय कुलकर्णी,
वरील विद्यार्थ्यांचे यशवंत,गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, उपप्राचार्य प्रा. श्रीमती के.जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. श्री.आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा.सौ. स्वाती बऱ्हाटे, प्रा.श्री. उमेश पाटील, विषय शिक्षक प्रा. श्री.अर्जुनशास्त्री मेटे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे. तसेच सर्व कार्यालयीन कार्यासाठी वरीष्ठ लिपिक श्री.मंगेश नेवे व श्री.युवराज पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.


Sir also got 96% in Sanskrit in 10th . I don’t think this are less marks 😔 please check my form My name is Rohit Pravin Jadhav
Your student Rohit jadhav
ओके