1 min read

आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन

Loading

आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन

अमळनेर :

स्व-पर कल्याणासाठी पदयात्रा करणारे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे २३ जून रोजी सकाळी ९ वाजता येथे आगमन झाले . त्यांच्या स्वागत व दर्शनासाठी देशभरातून येथे शेकडो भाविक आले होते.
येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन महाराजांनी नगरीत प्रवेश केला. मंदिर,मंदिर परिसरातील नवकार कुटिया व परिसराच्या स्वच्छ आणि पवित्रतेचे त्यांनी कौतूक केले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी विनोद कदम आदींनी आचार्य श्री महाश्रवणजी यांच्यासह ८० संतमुनींचे स्वागत केले. यावेळी डॉ. महाले यांनी त्यांना श्री मंगळग्रह मंदिराविषयी माहिती दिली.
आचार्य श्री महाश्रमण जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे ११ वे अनुशास्ता आहेत. त्यांनी आतापर्यंत स्व-पर कल्याणासाठी ५५ हजार कि.मी.ची पदयात्रा केली आहे. श्री मंगळग्रह मंदिरापासून त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. फरशी पूल ,पाचपावली चौक, आयडीबीआय बँक, आचार्य श्री तुलसी महाप्रज्ञ चौक, तेरापंथ भुवन, रिषभ फर्निचर या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रॅली पोहोचली. तेथे सव्वादहा वाजता मुख्य प्रवचन झाले.
दरम्यान रॅली मार्गावर स्वच्छता मोहीम राबवून रस्ते चकचकीत करण्यात आले होते. शहरात विविध ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले होते. तब्बल २५ वर्षांनंतर त्यांचे अमळनेर येथे आगमन झाले. या कार्यक्रमाचे सकल जैन श्री संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभा, तेरापंथ महिला मंडळ व तेरापंथ युवक परिषद, अमळनेर यांनी आयोजन केले होते.
दरम्यान महाराजांचे स्वागत , रॅली , दर्शन व प्रवचनासाठी अनेक जैनेतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *