1 min read

आदर्श विद्यालय अमळगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात

Loading

आदर्श विद्यालय अमळगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा….

आज दि.21 जून 2024 रोजी आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर सेंटरचे योग शिक्षक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. बी. एन. पाटीलसर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बी. एन. पाटीलसर व श्री. पवन वाघसर यांनी विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक स्वतः सादर करून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष करून घेतली. यावेळी कपालभाती, भस्रिका, अनुलोम- विलोम यासारखे प्राणायाम अत्यंत शास्रशुद्ध पध्दतीने करून घेतले. याशिवाय मेडीटेशन करून विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव व आनंद दिला. श्री. पाटीलसर व वाघसर नियमितपणे व्यक्ती व समाजामध्ये योगाविषयी जागृती निर्माण व्हावी व समाजामध्ये बंधूभाव टिकून राहावा यासाठी सदोदित प्रयत्न करीत असतात. हे त्यांचे कार्य निस्वार्थपणे स्वतः चा पैसा खर्च करून व कुठलीही अपेक्षा न करता ते करीत असतात हे विशेष आहे. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब आर. यु. पाटीलसर यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्यक्ष कृतीसाठी आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून दिली. सर्व शिक्षक - शिक्षकेतर बंधू-भगिनींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *