1 min read

मा .महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन.

Loading

मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वटसावित्रीपौर्णिमा निमित्त केले वडाचे झाडाचे पूजन.

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात.

आज जयहिंद कॉलनी येथे दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे वटसावित्री पौर्णिमा
निमित्त मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी वडाच्या झाडाचे पूजन केले. तसेच यावेळी पुरोहित दीपक कपोले यांनी कथा वाचन केले.

यावेळी प्रत्येक महिलेने इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या.
यावेळी परिसरातील समस्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी वटपौर्णिमाव्रत करिता पूजा साहित्य हे
हळद- कुंकू, गुलाल अक्षदा,उदबत्ती, निरांजन, आगपेटी,ताम्हण,पळी,पेला फळं, फुले, दिवा, १ नारळ, सुपारी ५, गुळ,कापसाचे व कापडाचे वस्त्र,वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, विड्याचे पान ५, बसण्यासाठी आसन, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, तुळशी व दुर्वा, कापूर, सौभाग्य वायन इत्यादी लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *