1 min read

योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न

Loading

योग दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी येथे आंतराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात संपन्न

आज दि २१ जून २०२४ शुक्रवार रोजी कर्मवीर तात्याहरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी येथे ता.भडगाव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. आर.पी.पाटील सर व जेष्ठ शिक्षक एस.एस. पाटील सर यांनी विविध योगासने घेऊन त्यांचे फायदे काय आहेत हे सविस्तर माहिती सह विषद करुन सांगितले.
तदनंतर सर्व विद्यार्थी व पालक यांच्या समवेत अंमली पदार्थ सेवन न करण्याबाबत जनजागृती करून शपथ घेण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले
सदरील कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब श्री.आर.डी.महाजन सर ,ग्रामसेवक,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य ,नागरीक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील प्रत्यक्ष योगासने करुन या योगशिबीरात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *