1 min read

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ईनशुलकर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार

Loading

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ईनशुलकर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळ च्या वतीने नुकताच रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयाचे तथा हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर यांची मुख्याध्यापकपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल नुकताच सत्कार समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला..
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक आशिष शिंदे होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. अध्यक्ष तथा मार्गदर्शक दीपक पवार यांनी केले.. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर इनशुलकर मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सहपत्निक सत्कार शाल,बुके,पुस्तक देऊन हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तथा सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक आशिष शिंदे, सचिव दिलीप पाटील, खजिनदार तथा सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील,
जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा मुख्याध्यापक एन आर चौधरी, मार्गदर्शक दिपक पवार,प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन,परीक्षा समिती सदस्य कमलाकर संदानशिव, सदस्य डॉ किरण निकम,प्रदीप चौधरी यांनी केला.
यावेळी पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सचिन साळुंखे, सौ प्रतिभा जाधव संचालक साने गुरुजी पतपेढी अमळनेर,अविनाश मोरे,योगेश पाटील,प्रमोद पाटील यांनी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इनशुलकर यांचा सहपत्निक सत्कार केला..
सत्काराला उत्तर देतांना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर म्हणाले की हिंदी अध्यापक मंडळ हा परिवार आहे.. परिवाराने केलेला सत्कार नेहमीच ऋणात राहील व मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मिळाल्याने ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले.शेवटी आभार प्रदर्शन
डॉ किरण निकम यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *