1 min read

चिखल-अड्ड्यांचा तुडवीत रस्ता माझ्या कॉलनीतून चल माझ्या दोस्ता कशी झाली महात्मा फुले कॉलनीची अवस्था !

Loading

चिखल-अड्ड्यांचा तुडवीत रस्ता माझ्या कॉलनीतून चल माझ्या दोस्ता कशी झाली महात्मा फुले कॉलनीची अवस्था !

अमळनेर – शहरातील कॉलन्यांमध्ये खिरापत वाटावी तसे छोट्या-छोट्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करुन दिखावा केला गेला बाकीचे रस्ते मातीचे आहेत. दर्शनी भागाचे रस्ते तकलादू बनवून शेखी मिरवण्याचा आणि उद्घटनाचा सोपस्कार केला गेला.परंतू काॅलनीच्या आतील रस्ते आहेत तसेच मरणपंथाला आहेत . एकंदरीत लोकप्रतिनिधींनी आणि न.पा.ने ” वरून नट्टा पट्टा आतून चुण्याचा भट्टा ” अशी काॅलनी परिसरातील अवस्था आहे. याचे ज्वलंत उदाहरण आमच्या प्रतिनिधीच्या नजरेत आले ते महात्मा फुले कॉलनी-पिंपळे रोडच्या कॉलनीचे!

पिंपळे रोडवरील महात्मा फुले काॅलनीत पावसाळ्याच्या सुरूवातीलाच रस्त्यांवर पाण्याचा तलाव साचल्यासारखे दृष्य आहे. या रस्त्यांवरून शाळा काॅलेजच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील अबालवृद्ध वापरत असतात. तसेच पिंपळे रोडवरील नाल्याचे काम सुरु असल्याने शंकरनगर पासून ते विठ्ठल नगर पर्यंतच्या नागरिकांची वाहने महात्मा फुले कॉलनीतून जा-ये करतात. परंतु नागरिकांच्या या हेळसांडीकडे कुणीच लक्ष दद्यायल तयार नाही, नगरपरिषदेत हक्काचा नगरसेवक नाही. तिथे प्रशासक नेमलेले आहेत. प्रशासकांना वार्डात येणारा सफाई मुकादम रस्त्याची दुरावस्था पाहून निरोप देऊ शकत नाही. त्यामुळे शहरातील काॅलनी परिसरातील समस्या प्रशासकांना समजत नाही .प्रशासक हे “मी म्हणजे राज्य” या अविर्भावात खुर्चीवर विराजमान आहेत. तरी त्यांनी महात्मा फुले काॅलनीतील रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी निदान तात्पुरती सोय म्हणून मुरुम टाकावा अशी आग्रही मागणी परिसरातून होत आहे. अन्यथा नागरिक नगरपरिषदेत येऊन जागर करत म्हणतील”
चिखल-खड्ड्यांचा तुडवीत रस्ता
माझ्या कॉलनीकडे चल माझ्या दोस्ता…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *