1 min read

बाप

Loading

बाप

कुटुंबाची वेल,ज्या वेलीवर संसार फुलतो ,ती वेल असतो बाप. परिवाराचं विश्व बाप,ज्यात परिवार सामावतो, अश्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतो बाप… संसाररूपी गाडी असते त्या गाडीचं एक चाक असतो बाप… झेलुनि दुःख मनात ठेवतो, अन् परिवाराला मात्र सुखछाया देणारा असतो बाप … अंधार मुक्त करून प्रकाश देणारा दिवा असतो बाप … ‌येवू द्या संकटे कितीही, नौका पार करत असतो तो बाप.. खोल आत लागलेला असा सूर असतो बाप… आपली अनमोल अशी संपत्ती अन् सातबारा उतारा. असतो बाप….. आकाशासारखं कर्तृत्व असतं त्याचं…कधीच होऊ शकत नाही मोजमाप… असा असतो कुटुंबाचा भक्कम आधारवड बाप ..

अजय भामरे. (बाप दिनानिमित्त)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *