सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन..
![]()

सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन..
धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : सोलापूर-नागपूर हॉलिडे स्पेशल ट्रेन मध्यंतरी चालविली गेली होती. आता नियमित स्वरूपात सोलापूर नागपूर ट्रेन सुरु करण्याचे निवेदन सिनियर डी.सी.एम. योगेश पाटील यांच्याकडे सोलापूर विभाग यांना धरणगाव तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांच्याकडून देण्यात आले. निवेदनात सोलापूर-नागपूर ट्रेनला पाचोरा आणि जळगाव थांबा द्यावा. याबाबत डीसीएम साहेबांनी सकारात्मक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्याबद्दल धरणगाव प्रवासी मंडळाने आभार व्यक्त केले. यामार्गावर एकही ट्रेन नसल्याने धरणगाव प्रवासी संघटना खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रवासी मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

