1 min read

नाशिक जिल्ह्यातील उर्वरित थकीत व चौकशी आणि वैद्यकीय बिलांचा प्रश्न मार्गी

Loading

नाशिक जिल्ह्यातील उर्वरित थकीत व चौकशी आणि वैद्यकीय बिलांचा प्रश्न मार्गी

शिक्षक आमदार किशोर भिकाजीं दराडे, नाशिक विभाग, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर बंधू व भगिनी यांना नम्रपूर्वक कळवितो की, नाशिक जिल्ह्यातील ज्या कर्मचारी यांचे उर्वरित थकीत व चौकशी बिले प्रलंबित होते त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 200 कोटीची रक्कम व पुन्हा अतिरिक्त काल 50 कोटीचा निधी उपलब्ध करून, शिक्षण संचालक, पुणे यांचेकडे वर्ग झालेला असून, सदर निधीचे वितरण तात्काळ करण्यास वेतन पथक अधीक्षक यांना त्यांचे लॉगिनवर Tab Active करून देऊन, प्रलंबित थकीत, चौकशी समितीच्या बिलांची व वैद्यकीय बिलांची रक्कम कर्मचारी यांचे खाती 22/6/2024 च्या आंत वर्ग करण्याचे पुढील आदेशमाझ्याकडून व शिकण संचांनालाय, पुणे यांचेकडून देण्यात आलेले असून, आपापल्या शाळेतील ज्या ज्या कर्मचारी यांची प्रलंबित थकीत बिले असतील ती त्यांनी शाळा लॉगिन वरून Forward करून, ती वेतन पथक कार्यालयाकडून येत्या दोन दिवसात Approved करून घ्यावी. कोणताही, कुठल्याही शाळेतील कर्मचारी यांची कोणत्याही प्रकारची कोणी अडवणूक केल्यास थेट माझ्या 9822651850 या मोबाईल नंबरवर थेट संपर्क करावा. सर्व शाळांनी आपल्या शाळेतील कुठलाही कर्मचारी हा त्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी.
आपलाच सेवक-
किशोर भिकाजी दराडे
शिक्षक आमदार, नाशिक विभाग, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *