विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक,छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध
![]()

विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक,छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीकरिता उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज सोमवार, १० जून २०२४ रोजी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.
शिक्षक आमदार किशोर भिकाजी दराडे हे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते.. ते पुन्हा निवडणूक लढवीत आहेत त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.कर्मचाऱ्यांना जोपर्यंत पेंशन मिळत नाही तोपर्यंत मी पेंशन घेणार नाही असा संकल्प केला आहे. शिक्षकांचा राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्यासाठी पाठपुरावा केला.यश मिळाले, शिक्षकांचा पगार १ तारखेला केला,मेडिकल बील व अनेक समस्या सोडल्या..
व 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त टप्याटप्याने अनुदानावर आलेले कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन साठी लढा देत आहे त्यांची अनेक मेळावे होत आहेत व त्यांचा प्रचार प्रसार हा पद्धतशीर जिल्ह्यात तालुक्यात होतांना दिसत आहे.. ते शिंदे गटात आहेत तर
शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अँड संदीप गुळवे ,निशांत रंधे,पेंशनसाठी लढा देणारे दिलीप डोंगरे,राजेंद्र निकम,
सचीन झगळेसह अनेक उमेदवारांनी निवडणूक लढवित आहेत…या उमेदवारांचा प्रचार नाशिक विभागात सुरू आहे.. त्यामुळे सध्या तरी शिक्षक आमदारकीची निवडणूक चुरशीची झाली आहे सर्वच उमेदवार हे शिक्षकांच्या लढ्यासाठी लढा देणारे आहेत पण बऱ्याच शिक्षकांमध्ये चर्चा आहे की शिक्षकाचा आमदार शिक्षक झाला पाहिजे अशी सध्या तरी चर्चा सुरू आहे..पण येणारा काळ ठरवेल..सध्या तरी किशोर भिकाजी दराडे प्रचारात आघाडीवर आहेत..
चौकट
शिक्षक आमदार हे फक्त निवडणुकी पुरते शिक्षक आमदार असतात .निवडून आलेल्या नंतर ते फक्त आमदार असतात. असा माझा चुकीचा अनुभव आहे. अन्यथा दर निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न कमी न होता वाढलेले असतात.शिक्षकांचे सुध्धा प्रवर्ग झालेत.पगारी ,बिन पगारी ,पेन्शन वाला ,पेन्शन साठी झगडणारा , कधीही पेन्शन न मिळणारा. हे होत असताना शिक्षक आमदार काय करत होते? त्यांना पेन्शन पण मतदारांना टेन्शन.असो शिक्षक आमदार झाल्या नंतर मतदार संघातील शाळेत जावून एक वर्ग पाठ घ्या.किमान कोणाला तरी प्रेरणा मिळेल. व तुम्ही शिक्षक आहात याचे भान तुम्हालाही राहील.
विजय सोनवणे
मा.मुख्याध्यापक तथा सचीव
भरवस ता.अमळनेर माध्यमिक विदयालय
२) 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या राज्यातील पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी सोडवावा व पावसाळी अधिवेशनामध्ये अध्यादेश काढावा अशी पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे.. शिंदे सरकारकडून कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे
प्रकाश भिका पाटील
प्राचार्य
मंगरूळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तालुका अमळनेर


