खान्देशातील महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रतिपादन
![]()

खान्देशातील महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- खान्देशच्या इतिहासात अनेक संत व थोर पुरुष होऊन गेले सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक विकसित भारत देश निर्माण केला पाहिजे.. आज
देशात हुकुमशाही, अशांतता,बेरोजगारी, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नको त्या गोष्टींना विरोध केला पाहिजे,
सत्ताधारी पक्षात विरोधी पक्षाला खूप महत्त्व आहे.. पण ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणू शकत नाही, चुकीच्या गोष्टींना विरोध करू शकत नाही ही शोकांतिका आहे.. म्हणून समाजातील प्रश्न पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तरच देशात शांतता व सुव्यवस्था व जनतेचे प्रश्न सुटतील असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक अविनाश पाटील यांनी अमळनेरला संदीप घोरपडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्ताने बोलत होते..
यावेळी काँग्रेसचे भावी विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवार संदीप घोरपडे यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत काँग्रेस विचारधारा ते पोहोचत आहेत.. कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षाशी त्यांची नाळ आहे.. वरिष्ठ पातळीवर पदाधिकारी पक्षाचे नेते मंडळी यांनी जळगाव जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली. अंमळनेर तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागातील जनतेशी ते संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आज अमळनेरला साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात झाले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व इतर पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. साने गुरुजी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, साने गुरुजी आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक,
साने गुरुजी नूतन महाविद्यालय व कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. व संदीप घोरपडे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..




