आर एस पी व नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा -अनिल गावीत
![]()


आर एस पी व नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा -अनिल गावीत
कुणाची वाट न पाहता जो मदतीला धावतो तो म्हणजे आपत्ती स्वयंसेवक – डॉ.किशोर अढळकर
आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत सिव्हिल डिफेन्स बाबत मार्गदर्शन !
कल्याण दि.५(प्रतिनिधी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत बुधवार दिनांक ५/६/२०२४ रोजी असिस्टंट डेप्युटी कंट्रोलर श्री.अनिल गावीत व मोटिवेशनल स्पीकर डॉ.किशोर अढळकर यांनी सिव्हिल डिफेन्स व आपत्ती व्यवस्थापन याबाबत
Brighton world school,( गुरुकृपा शिक्षणशास्त्र महाविद्यालय) गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, शाळेचे प्रिन्सिपल श्री.सचिन आवळे, आर एस पी ठाणे, नवीमुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,ठाणे,पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.श्री. मनिलाल रतिलाल शिंपी, कोकण विभागीय समादेशक डॉ.श्री. श्रीकांत पाटील,आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्र सिव्हिल डिफेन्स चे काम फक्त सहा जिल्ह्यांमध्ये होतो. सदर काम हे संपूर्ण महाराष्ट्रात कसे करता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. कोकण झोन मध्ये वादळ ,चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती याबाबत प्लॅनिंग केले जाते. त्यासाठी तीन समित्या नेमल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने सल्लागार समिती, प्लॅनिंग समिती व स्टार कमिटी यांचा समावेश आहे.
या कमिट्यांचे प्रमुख केंद्रीय महसूल मंत्री किंवा गृहमंत्री असतात. व त्यानुसार ते प्लॅन करतात. उदाहरणार्थ कोकण,
कोकणामध्ये वादळ, चक्रीवादळ ,नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे तर त्यासाठी काय केले पाहिजे हे ठरवले जाते. आमच्या अनेक शाखा आहेत त्यामध्ये गृह विभाग ,गुप्त वार्ता, महसूल विभाग ,विशेष शाखा आर्ट याव्यतिरिक्त अजून आहेत. सिव्हिल डिफेन्स हे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध झाले तेव्हापासून आहे. मात्र १० जुलै १९७८ रोजी संसदेत कायदा पास झाला. तेव्हापासून सुरुवात झाली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन व माहितीचा अधिकार हा कायदा २००५ साली पास झाला. त्यानंतर या कायद्याचा सर्वांना उपयोग झाला आहे. नागरी संरक्षण दल या कायद्यामध्ये बदल होऊन नैसर्गिक आणि मानव निर्मिती आपत्ती यांचा समावेश केला तेव्हापासून हे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणून आता तुम्ही सर्वांनी नागरिक संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा असे आवाहन मार्गदर्शन करताना असिस्टंट डेप्युटी कंट्रोलर श्री.अनिल गावीत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. आपत्ती व्यवस्थापन हे का करावे, काय असते, आणि त्यासाठी आपण तो कोर्स का करावा? असे तीन प्रश्न आहेत. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय? आणि आपण ते का करावं? आपल्याकडे सरकार आहे, पोलीस आहे, तरीसुद्धा हा कोर्स करण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शक बोलावला जातो. ते आपल्याला सांगणार मग आपण ट्रेनिंग घेणार. पथक यंत्रणा आहे, परंतु मुलातच प्रत्येकाला करायची इच्छा असते काहीं ना काहीतरी करायची इच्छा असते आणि ते आपण करू शकत नाही. आणि आपण करतो त्यावेळी चुका करतो. चुका कशा होतात, एखादा अपघात झाला आहे, आपण बघतो तो माणूस रस्त्यावर पडून तळमलतो, काय करतो आपण एक म्हणतो ते माझे काम नाही आधीच मला लेट झाले आहे, दुसरा असतो तो म्हणतो अरे नाही रे त्याला मदत केली पाहिजे पण कशी करणार माहिती काहीच नाही आहे, गर्दी घुंगट असतो आणि आपले ७० टक्के बांधव त्या तलमलणाऱ्या व्यक्तीची मोबाईलवर व्हिडिओ काढत असतात. तू कसा पडला तो का बोंबलतो आहे, कसा मेला याबाबत एका चित्रपटात वर्णन देखील केलेला आहे, की तो व्हिडिओ बनवत असताना त्या व्यक्तीचा जीव जातो. व ती क्लिप सदर व्यक्ती पत्रकारांना देतो. मी सांगितले जाते की अमुक रस्त्यावर अपघात झाला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला पण त्याला मदत मिळू शकली नाही. त्याचे कारण असे की, आपण फक्त सरकारला दोष देत असतो. त्याचं कारण आपण निरभिन्न असतो. परंतु तो कसा पडला त्याला एखाद्या गाडीने धडक दिली का, की त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला, की हार्ट अटॅक आला ,की फिट आली होती. या छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नसते. त्यामुळे ते ज्ञान घेणे गरजेचे आहे म्हणून आज आपण प्रशिक्षणाला बसलो आहोत. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनात एखाद्या ठिकाणी बिल्डिंग कोसळली, भीषण आग लागली, किंवा बॉम्बस्फोट झाला, इथून कधी सुरुवात होते. तसेच महापुर येणे ,भूकंप होणे, त्यावेळी तुमच्यापर्यंत सरकार किंवा पोलीस यंत्रणा पोहोचत नाही, अशावेळी जी लोक काम करतात ती आपत्ती व्यवस्थापनातील प्रशिक्षण घेतलेली माणसं असतात. ती आपली स्वतःची मदत करतात त्याचप्रमाणे इतरांची मदत करतात व त्याचबरोबर सरकारची ही मदत करतात. म्हणून आपणही मदत करायला शिकले पाहिजे. आपल्यामध्ये न्यूनगंड आहे, काही समज आहे, की कुणीतरी येऊन मदत करावी, त्यापेक्षा कुणी कशाला मी का नको ही भावना निर्माण करणारा कोण असेल तर तो आपत्ती व्यवस्थापन मधील एक मदतनीस असेल. असे मार्गदर्शन करताना सिव्हिल डिफेन्सचे मोटिवेशन स्पीकर डॉ.श्री.किशोर अढळकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी यांनी केले.तसेच सूत्रसंचालन श्री.विनोद शेळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर एस पी कमांडर तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी यांनी केले.
हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे व त्यांची संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहे.

