जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण
![]()

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक ०५/०६/२०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मा. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रसंगी माजी नगरसेवक नरेद्र रामभाऊ संदानशिव, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, शहर अभियंता दिगंबर वाघ, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, प्रभाग मुकादम सागर पवार, शहर समन्वयक गणेश गढरी, युनूस शेख, प्रभागातील सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सदर ठिकाणी 25 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलेले असून मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांनी अमळनेर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी जास्तीत जास्त आपल्या घराजवळ मोकळ्या जागेत व परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. तसेच आपला परिसर व पर्यावरण व स्वच्छ, सुंदर ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.