1 min read

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून केला नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ

Loading

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून केला नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ
न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचा पर्यावरणपूरक उपक्रम
अमळनेर-“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे ब्रीद समोर ठेवून येथील न्यु व्हीजन इंग्लिश मिडीयम स्कुलने ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून नविन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ केला.
नवीन शैक्षणिक वर्षात नववी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा 5 जुन रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने यादिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्याच हस्ते पर्यावरण दिनानिमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच त्यांना पर्यावरण आणि वृक्षारोपण याचे महत्व सांगण्यात आले.शाळेच्या शिक्षिकानी वृक्षारोपण केले.यावेळी शाळेचे चेअरमन निलेश लांडगे,अध्यक्ष शीतल देशमुख, प्राचार्या सौ प्रेरणा पाटील व शिक्षिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *