ऑटोसॉफ्ट इंजिनीअर्स व ग्रामविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकू येथील तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण ….
![]()


ऑटोसॉफ्ट इंजिनीअर्स व ग्रामविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकू येथील तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण ….
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
एखादा तरुण जेव्हा गावाच्या विकासासाठी काहीतरी धडपड करण्याचा प्रयत्न करतो.. तो कोणत्याही देशात नोकरीसाठी असला तरी आपल्या मातृभूमी विषयी व जन्मभूमी विषयी त्याच्या मनात असलेला आदर व गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी व विविध उपक्रम राबवण्यासाठी पंकज पाटील नावाचे युवा व्यक्तिमत्व यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून घेतले आहे..
ढेकू गावाचे आदर्श व्यक्तिमत्त्व श्री पंकज पाटील यांच्या प्रयत्नाने ऑटोसॉफ्ट इंजिनीअर्स व ग्रामविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यांत आले, तरुणांसाठी सदर प्रशिक्षण कुक्कुट पालन व शेती विषयक होते.
गावात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी व गावाचा विकास व्हावा या साठी ग्राम विकास मंच व सर्व सभासद सतत विकास कार्य राबवित आहे,
प्रशिक्षणाला ग्रामविकास मंच
सभासद श्री किरण पाटील, जितेंद्र पाटील रोहण पवार मनोज पाटील जयेश साळुंखे मयूर पाटील व तरुण होतकरू युवकांची उपस्थिती होती.
विकास मंच तर्फे सर्व तरुणांना आपण पाठिंबा देऊ तसेच गावाच्या विकासाला हात भार लाऊ असे आव्हान ग्रामविकास मचं सर्व नागरिकांना करत आहे.

